Narendra Dabholkar
Narendra Dabholkar Saam Tv
महाराष्ट्र

Narendra Dabholkar: 'सनातन'चा वीरेंद्रसिंह तावडे समाजासाठी धोकादायक; दाभोलकर हत्येप्रकरणी CBI नं उच्च न्यायालयात केला जामीनास विरोध

Siddharth Latkar

सातारा : सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर (narendra dabholkar) यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वीरेंद्रसिंह तावडे (virendrasinh tawade) याचा हेतू 'हिंदूविरोधी' आणि सनातन संस्थेच्या श्रद्धा आणि रूढींना विरोध करणाऱ्या लोकांना संपवण्याचा होता असे केंद्रीय अन्वेषण विभागाने (cbi) मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) नमूद केले.

तावडेला जामीन देण्यास विरोध दर्शवित सीबीआयने तावडे संदर्भातले त्यांचे मुद्दे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहेत. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, वैचारिक मतभेदांमुळे दाभोलकरांना संपवण्यासाठी शार्प शूटर्सला पाचारण करण्यात आले हाेते. दरम्यान हा खटला सुनावणीसाठी ठेवण्यात आला होता परंतु वेळेअभावी त्याची सुनावणी होऊ शकली नाही.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून नागरिकांमधील अंधश्रद्धा दूर करण्याचे कार्य करणा-या डाॅ. नरेंद्र दाभोलकर (narendra dabholkar) यांची २० ऑगस्ट २०१३ ला पुण्यात (pune) मॉर्निंग वॉकला जाताना दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यामधील आरोपींचा गोविंद पानसरे, एमएम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या खूनात देखील सहभाग असल्याचा म्हणणे सीबीआयचे म्हणणे आहे.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार तावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सनातन संस्थेने (Sanatan Sanstha) नमूद केलेल्या 'क्षात्रधर्म साधने'च्या शिकवणीचे पालन केले, जे कथित दुष्ट, हिंदूविरोधी, धर्मद्रोही आणि दुर्जन यांच्या विरोधात होते.

"संशयित आरोपीने आणि सनातन संस्था,हिंदू जनजागृती समिती (Hindu Jan Jagruti Samiti) यांना न आवडणारे किंवा सहन न हाेणारे कोणतेही कृत्य करणाऱ्यांवर क्रूरपणे कारवाई केली जाईल, अशी भावना या गुन्ह्यातून निर्माण केले गेली आहे. ही भावना धमकावण्यापेक्षा जास्त धाेकादायक आहे. लोकांची आणि राष्ट्राची सुरक्षा. त्याचा समाजावर भयंकर परिणाम झाला," असे सीबीआयने प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KKR vs RR, IPL 2024: राजस्थान रॉयल्सचं नशीबच फुटकं! पावसामुळे झालं मोठं नुकसान

संभाजीनगर : गर्भपात रॅकेटचा केंद्रबिंदू भोकरदन; डाॅक्टरांसह औषध व्यावसायिक शहरातून गायब

Malegaon News: साडेतीन तासांत एकही गावकरी मतदान केंद्राकडे फिरकला नाही, मालेगावमधील मेव्हणे गावात नेमकं काय झालं?

Marriage Tips: लग्नानंतर नववधूने हातात किती हिरव्या बांगड्या घालाव्यात?

Grandfather Dance Video: नाद ओ बाकी काय नाय! ढोलकीचा आवाज कानी पडताच आजोबांनी धरला लावाणीवर ठेका; VIRAL VIDEO

SCROLL FOR NEXT