CBI  Saam tv
महाराष्ट्र

Nashik : सीबीआयची नाशिकमध्ये मोठी कारवाई, १५ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Indian army corruption scandal : नाशिकच्या तोफखाना व आर्मी एव्हिएशन सेंटरमधील १५ लष्करी अधिकाऱ्यांवर सीबीआयने भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केले. व्हॉट्सअ‍ॅप चॅट व बँक व्यवहारांद्वारे लाचखोरीचे पुरावे उघड.

Namdeo Kumbhar

CBI FIR against army officials : सीबीआयने नाशिक येथील लष्करी विभागातील भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश केला आहे. नाशिकच्या तोफखाना केंद्र आणि आर्मी एव्हिएशन सेंटरमधील १५ अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयने ११ भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. लेखापरीक्षक, सहाय्यक लेखाधिकारी आणि लिपिकांवर लष्करी कर्मचाऱ्यांकडून लाच घेऊन आर्थिक फायदा मिळवल्याचा गंभीर आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांनी वेतन आणि भत्ते वेळेवर देण्यासाठी लष्करी कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळले. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सीबीआय आणि पुण्याच्या संरक्षण लेखा नियंत्रकांनी संयुक्तपणे अचानक छापा टाकला. या कारवाईत व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स, लाच मागणीचे संदेश आणि बँक व्यवहारांचे पुरावे हाती लागले. अधिकाऱ्यांच्या मोबाईलमधून लाचखोरीचे संवाद आणि आर्थिक व्यवहारांचे स्पष्ट पुरावे मिळाले. याशिवाय, लाचखोरीसाठी वापरलेली बँक खाती आणि त्यातील व्यवहारांची माहितीही सीबीआयने तपासात उघड केली.

या प्रकरणात सरकारी पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर आर्थिक लाभ घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली हे गुन्हे दाखल झाले आहेत. सीबीआयने मुंबई, नाशिक, लखनऊ, अहमदाबाद आणि नागपूर येथेही या अधिकाऱ्यांच्या घरी छापे टाकले. या कारवाईने संरक्षण यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. सीबीआयचा तपास सुरू असून, याप्रकरणी आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

SCROLL FOR NEXT