Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Shruti Vilas Kadam

झोपेत बोलण्याच्या सवयीला काय म्हणतात?

झोपेत बोलण्याला वैद्यकीय भाषेत ‘सोम्निलोकी’ (Somniloquy) म्हणतात. यामध्ये व्यक्ती झोपेत असताना बडबड करते, काही शब्द किंवा पूर्ण वाक्येही बोलू शकते. अनेकदा सकाळी उठल्यानंतर त्याला याची आठवण राहत नाही.

sleep | pinterest

झोपेत बोलणे सामान्य असू शकते

अधूनमधून झोपेत बोलणे ही सामान्य गोष्ट आहे बहुतेक वेळा त्यामागे कोणताही गंभीर आजार नसतो. लहान मुलांमध्ये ही सवय सामान्यपणे दिसते.

sleep | pinterest

तणाव आणि अपुऱ्या झोपेमुळे वाढू शकते समस्या

मानसिक तणाव, झोपेची कमतरता, ताप किंवा वारंवार झोपमोड होणे यांमुळे झोपेत बोलण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे पुरेशी झोप घेणे आणि तणाव नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे.

sleep | pinterest

स्वप्नांमुळेही झोपेत बोलणे होऊ शकते

झोपेच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मेंदूची क्रिया सुरू असते. यावेळी काही व्यक्ती स्वप्न पाहताना तसचं बोलतात. मात्र, झोपेत बोललेले प्रत्येक वाक्य स्वप्नाशी संबंधित असतेच असे नाही.

sleep | pinterest

ओरडणे किंवा झोपेत चालणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नका

झोपेत वारंवार मोठ्याने ओरडणे, हात-पाय जोरात हलवणे, झोपेत चालणे किंवा स्वप्नातील प्रसंग प्रत्यक्षात केल्यासारखे वागणे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Sleep | pintrest

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

प्रौढ व्यक्तीला अचानक झोपेत बोलण्याची सवय सुरू झाली, ती वारंवार वाढत गेली किंवा दिवसभर थकवा जाणवू लागला, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

Sleep | GOOGLE

चांगल्या झोपेसाठी या सवयी लावा

दररोज ठरावीक वेळी झोपणे, पुरेशी विश्रांती घेणे, झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर कमी करणे आणि तणाव कमी करणे यामुळे चांगली झोप लागते.

sleep | canva

Hair Fall: केसगळती आणि केस तुटण्याची समस्या होईल कमी; आठवड्यातून २ वेळा लावा हे घरी बनवा खास तेल

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा