Manasvi Choudhary
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भाविक उपवासाचे व्रत करतात. उपवासादरम्यान शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी लिंबू पाणी, नारळ पाणी हे ड्रिंक प्यायले जातात. परंतु उपवासादरम्यान नारळ पाणी आणि लिंबू पाणी यापैकी कोणते ड्रिंक्स पिऊ शकता ते जाणून घ्या.
नारळपाण्यामध्ये पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. हे ड्रिंक प्यायल्यामुळे उपवासादरम्यान थकवा आणि अशक्तपणा येत नाही.
नारळपाण्यात नैसर्गिक साखर असते यामुळे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते.
उपवासाच्या वेळी पोट रिकामे राहिल्यामुळे होणारा जळजळ आणि ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी नारळपाणी अत्यंत प्रभावी ठरते.
लिंबूपाण्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
लिंबूपाणी पचनसंस्था डिटॉक्स करते आणि पोटातील गॅस किंवा अपचनाची समस्या दूर ठेवते.
तुम्ही वजन कमी करण्यासाठी उपवास करत असाल, तर गुळ किंवा सैंधव मीठ घातलेले कोमट लिंबूपाणी प्या.