mp dr jaisiddeshwar shivacharya mahaswami, solapur saam tv
महाराष्ट्र

Solapur Lok Sabha : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजप नवख्या चेहऱ्याला संधी देणार? जयसिद्धेश्वर स्वामींच्या 'त्या' प्रकरणावर लवकरच निकाल

आगामी तीन महिन्यांत समितीला या प्रकरणावर अंतिम निकाल द्यावा लागेल अशी सद्य:स्थिती आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News :

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील (solapur lok sabha constituency) भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी (mp dr jaisiddeshwar shivacharya mahaswami) यांच्या जात प्रमाणपत्राची फेरचौकशी (Caste Certificate Case) करण्यासाठी सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ३ महिन्यांच्या मुदतवाढीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती सामोर आली आहे. या प्रकरणी यापूर्वी उच्च न्यायालयाने दिलेली मुदत ५ जानेवारीला संपल्याने समितीने मुदत वाढीसाठी न्यायालयात धाव घेतल्याचे समजते. (Maharashtra News)

लोकसभा निवडणुकीवेळी (loksabha election) खासदार डॉ. महास्वामी यांनी जातीचे बनावट प्रमाणपत्र दाखल केल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंदकुरे यांनी जात पडताळणी समितीकडे दाखल केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

समितीचे तत्कालीन अध्यक्ष ज्ञानदेव सूळ यांनी या प्रकरणात दक्षता पथक नेमून दोन्ही बाजूंची सुनावणी घेतली. दक्षता पथकाचा अहवाल आणि उपलब्ध कागदपत्रांनुसार खासदारांकडील जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला होता.

त्यावेळी आपल्याला पुरेशी कागदपत्रे सादर करण्यास आणि म्हणणे मांडण्यास समितीकडून पुरेसा वेळ दिला नसल्याप्रकरणी खासदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणाची सहा महिन्यांत फेर चौकशी करून निर्णय घ्यावा आणि त्याचा अहवाल न्यायालयास सादर करावा असे आदेश दिले होते.

त्यानुसार समितीचे विद्यमान अध्यक्ष बी. जी. पवार यांनी दक्षता पथक नेमले आणि या प्रकरणाची फेरचौकशी सुरू केली. मात्र,खासदारांच्या वडिलांच्या १०८ वर्षांपूर्वीच्या जन्म-मृत्यू नोंदीची परराज्यातील न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेतून तपासणी व्हावी अशी मागणी खासदारांच्या वकिलांनी समितीकडे केली.

त्यास परवानगी देण्यात आली असून आता अक्कलकोट तहसीलदारांमार्फत प्रयोगशाळेतून त्या कागदपत्रांवरील नोंदीची पडताळणी होणार आहे.

दुसरीकडे दक्षता पथकाचे दोन्ही सदस्य वैयक्तिक कारणास्तव रजेवर असून या पथकाचाही अहवाल समितीला मिळालेला नाही. तरीपण, आगामी तीन महिन्यांत समितीला या प्रकरणावर अंतिम निकाल द्यावा लागेल अशी सद्य:स्थिती आहे.

डॉ. महास्वामींना पुन्हा उमेदवारी मिळणार का ?

मागील लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकरणाची फेरचौकशी सुरू झाली आहे.

समितीच्या मागणीनुसार उच्च न्यायालयातून तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यास खासदारांच्या जात प्रमाणपत्रावरील अंतिम निर्णय मार्चअखेर होवू शकतो. त्यामुळे सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून पुन्हा डॉ. महास्वामी यांनाच की दुसऱ्या नवख्या चेहऱ्याला उमेदवारी मिळणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

SCROLL FOR NEXT