Ambajogai Police Station विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड: माहितीचा अधिकार का मागवला म्हणून एकास चोप

या दोन्ही प्रकरणात एकूण तब्बल 11 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

विनोद जिरे

बीड - घाटनांदूरमध्ये दोन गटात मोठा वाद झाला. माहितीचा अधिकार का दिला ? या कारणावरून 5 जणांनी एकास मारहाण केली. तर दुसरीकडे दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याचा कारणावरून 6 जणांनी हॉटेलचालकास (Hotel) मारहाण केली आहे. या दोन्ही प्रकरणात एकूण तब्बल 11 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पाहिल्यात घटनेत, संदिप अरविंद गोदाम यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी 6 मार्च रोजी घाटनांदूर ग्रामपंचायतमध्ये माहितीचा अधिकार दिला होता. 10 मार्च रोजी सरपंच पती ज्ञानोबा गोविंद जाधव , उपसरपंच सचिन बापूसाहेब देशमुख आणि ग्रामसेवक महेश फड यांनी संदीपला ग्रामपंचायतला बोलावून घेत माहितीचा अधिकार वापस घेण्यासाठी दबाव आणला. याबाबत संदीपने पोलिसांना माहिती दिली होती. 12 मार्च रोजी देखील सरपंच पतीने संदीपला धमकावले होते. त्यानंतर 18 मार्च रोजी संदीप कामानिमित्त अहिल्याबाई होळकर चौकात गेला असता, मद्यधुंद असलेल्या रमेश जाधव व प्रशांत रमेश जाधव या दोघांनी मद्यधुंद अवस्थेत संदीपला अडवले.

हे देखील पहा -

आमच्या बप्पाच्या विरोधात अर्ज का केलास असे म्हणत त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने संदीपच्या डोक्यात दगड घातला. आरोपी दगडाने आणखी मारहाण करण्याच्या प्रयत्नात असताना इतर ग्रामस्थांनी जखमी संदीपला बाजूला ओढले आणि खाजगी वाहनातून स्वाराती रुग्णालयात दाखल केले. दरम्यान सदर फिर्यादीवरून 5 आरोपींवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात कलम 307 , 324 , 341 , 109 , 34 , 504 , 506 सह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

तर दुसऱ्या घटनेत, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील हॉटेल व्यावसायिक विक्रम रमाकांत जाधव यांच्या फिर्यादीनुसार , त्यांची रेल्वे फाटकाच्या जवळ मटन खानावळ आहे. हॉटेलवर असताना त्यांच्या गावातील संदीप उर्फ रॉक अरविंद गोदाम , अरविंद गोदाम , विजय लक्ष्मण गोदाम , बालाजी विलास मिसाळ , सौरभ वाघमारे आणि रवी हजारे हे 6 जण मद्यधुंद अवस्थेत तिथे आले आणि सावलीसाठी लावली हिरवे पडदे पेटवून दिले. त्याचबरोबर दारूसाठी पैशाची मागणी करत, शिवीगाळ केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून 6 आरोपींवर कलम 323 , 324 , 327 , 427 , 435 , 143 , 147 , 148 , 149 , 504 , 506 नुसार अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: 'मी टीव्हीचा सुपरस्टार आहे...'; बिग बॉसमध्ये नवा वाद, फरहानाला गौरवने सुनावले खडेबोल

Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT