Samruddhi Mahamarg Car Truck Accident  Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात; रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघांचा जागीच मृत्यू

Samruddhi Highway Accident: छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल सावंगी परिसरात समृद्धी महामार्गावर शुक्रवारी (ता. ८) भीषण अपघात झाला. सुसाट वेगात जाणाऱ्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट समोरील ट्रकला पाठीमागून धडकली.

Satish Daud

रामू ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Mahamarg Car Truck Accident

छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल सावंगी परिसरात समृद्धी महामार्गावर शुक्रवारी (ता. ८) भीषण अपघात झाला. सुसाट वेगात जाणाऱ्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट समोरील ट्रकला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आलाय. मृतांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके (वय ३५) यांच्यासह संदीप साखरवाडे (वय ४०) यांचा समावेश आहे. तर, रितेश भानादकर (वय २४)  आणि आशिष सरवदे (वय ३७) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) अपघातांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त व्यक्ती हे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असून ते आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई येथे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना भेटण्याकरिता गेले होते. (Latest Marathi News)

तिथून परतत असताना हा भीषण अपघात घडला. छत्रपती संभाजीनगर हर्सुल सावंगी परिसरातील नागपूर कॉरिडॉर चैनल क्रमांक ४३६ वर कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने थेट समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरश: चुराडा झाला.

अपघातामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कार क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. त्याचबरोबर मृतदेह ताब्यात घेऊन अपघातातील जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

SCROLL FOR NEXT