Morbi Slab Collapse: गुजरातच्या मोरबीमध्ये मेडिकल कॉलेजचा स्लॅब कोसळला; ४ कामगार ढिगाऱ्याखाली अडकले, थरारक VIDEO

Gujarat Morbi Slab Collapse: गुजरातमधील मोरबी येथे पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली. येथील बांधकाम सुरू असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेत ४ कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
 Morbi Medical College Slab Collapse
Morbi Medical College Slab Collapse Saam TV
Published On

Gujarat Morbi Medical College Slab Collapse

गुजरातमधील मोरबी येथे पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली. येथील बांधकाम सुरू असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेत ४ कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. शुक्रवारी (ता. ८) रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 Morbi Medical College Slab Collapse
Narendra Modi: PM मोदींकडून विकासकामांचा धडका; आज सेला बोगद्याचं उद्घाटन करणार, चीनला धडकी भरणार!

बचाव पथक आणि पोलिसांनी अथक प्रयत्न करत ३ कामगारांना सुखरुप ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं आहे. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजूनही एक कामगार ढिगाऱ्याखाली अडकून आहे. (Latest Marathi News)

त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरबी (Gujarat News) येथे एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. शुक्रवारी पहिल्या मजल्यावर भरण्याचे काम सुरू असताना अचानक इमारतीचा स्लॅब कोसळला.

या दुर्घटनेत ४ मजूर स्लॅबच्या मलब्याखाली गाडले गेले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयाच्या इतर अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर बचाव पथक आणि पोलिसांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ३ मजुरांना बाहेर काढलं.

त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजूनही एक मजूर ढिगाऱ्याखाली अडकून आहे. त्याला वाचवण्यासाठी बचाव पथक आणि पोलीस शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

या थरारक घटनेचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्वीट केला आहे. याआधी देखील मोरबी येथे केबल ब्रीज कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी घडलेल्या या घटनेत तब्बल १४१ जणांचा जीव गेला होता. या घटनेमुळे गुजरात सरकारवर मोठी टीका झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com