Yavatmal Accident News Saam TV
महाराष्ट्र

Yavatmal Accident News: यवतमाळमध्ये ट्रकची कारला जोरदार धडक; भीषण अपघातात ३ जण ठार, १ जखमी

Car and Truck Accident News: या दुर्घटनेत एक तिघांचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

Yavatmal Accident News: यवतमाळ येथून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन वाहनांची जोरदार धडक होउन भीषण अपघात झालाय. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Accident News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चंद्रपूर येथून मारेगाव मार्ग यवतमाळच्या पांढरकवडा इथे वृत्तपत्राचे पार्सल घेऊन येणाऱ्या कारला अज्ञात वाहनाची धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. या धडकेत तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी राष्ट्रीय महामार्ग करंजी पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.

वाहन चालक किशोर बोरकर (राहणार वरोरा) असे एका मृतकाचे नाव आहे. अन्य दोन मृत व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही. मुसळधार पावसात अपघात झाल्याने राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस भर पावसात बचाव कार्य करत आहेत.

अपघातामळे ट्राफिक जाम

यवतमाळच्या (Yavatmal) करंजीजवळ झालेल्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अपघातामुळे बचावकार्य सुरू असल्याने मागून येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा येथे लागल्या आहेत. वाहतूक महामार्ग करंजी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमी व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात हालवण्यात आले आहे. तसेच वाहतूक पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT