Mumbai Crime News: खळबळजनक! बोगस पोलीस बनून तरुणाचे अपहरण; ५० लाखांच्या खंडणीची मागणी, टोळीचा म्होरक्या अटकेत

खोट्या ड्रग्स प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून सहा जणांनी अपहरण केल्याचा प्रकार घडला आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaamtv
Published On: 

संजय गडदे, प्रतिनिधी...

Mumbai Crime News: मुंबईच्या वर्सोवा भागातील एक तरुण व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. यश सावला असे या व्यावसायिकाचे नाव असून खोट्या ड्रग्स प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून ६ जणांनी अपहरण केल्याचा प्रकार घडला आहे.

तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणीची मागणीही केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट नऊने टोळीच्या म्होरक्यास गोरेगाव परिसरातून अटक केली आहे. (Crime News In Marathi)

Mumbai Crime News
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, दुभाजकाला धडकून कारचा चुराडा

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यश सावला हे त्यांच्या मैत्रिणीसोबत वर्सोवा परिसरातील बारमध्ये जाण्यासाठी निघाले होते. यावेळी तोंडावर मास्क लावलेल्या सहा जणांनी त्यांना जबरदस्तीने उचलून रिक्षात बसवले. तुम्ही ड्रग्स प्रकरणात सहभागी असून कारवाई टाळण्यासाठी 50 लाख रुपये द्या अशी मागणी आरोपींनी केली.

तसेच रात्रभर त्यांना मुंबईच्या विविध भागात फिरवले व आरोपींनी फिर्यादीकडून ५.३० लाख व एक मोबाईल हँडसेट खंडणी स्वरूपात उकळले. आरोपींनी फिर्यादीच्या घरी जाऊन कुटुंबीयांना देखील धमकावण्याचा प्रयत्न केला व त्यांच्याकडून बँक ऑफ बडोदचा साडेसात लाखाचा एक चेक घेऊन फिर्यादीला कुर्लाबैल बाजार परिसरात सोडून दिले.

Mumbai Crime News
UP Accident News: दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात! प्रवासी टेम्पोवर टँकर उलटला; ९ जणांचा मृत्यू

आरोपी अटकेत..

याप्रकरणी फिर्यादीने घटनेच्या तब्बल आठ दिवसानंतर वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यानुसार ६ अज्ञात आरोपीविरोधात कलम ३८६, ३६४ अ, ३२३, ५०४, ५०६ (२), ३४, १७० भादंविसं प्रमाणे गुन्हा नोंद केला. या प्रकरणी गुप्त माहिती दाराकडून मिळालेल्या बातमीनुसार कक्ष-९ च्या तपास पथकाने टोळीच्या म्होरक्यास सापळा रचुन ताब्यात घेतले.

त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्हयातील स्वत:चा तसेच त्याच्या इतर ५ साथीदारांचा सहभाग असल्याचे मान्य केले. आरोपीला आज १० जुलै रोजी मा. ३७ वे न्यायालय, किल्ला कोर्ट, मुंबई येथे रिमांडकरिता हजर केले असता न्यायालयाने त्याला 15 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.