Nagpur Accident News: देवदर्शनावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ट्रक आणि कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू

Nagpur Accident News: भंडाऱ्याकडे निघालेल्या कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात झाला आहे.
Nagpur Accident News
Nagpur Accident NewsSaam tv
Published On: 

Nagpur Accident News: नागपुरात अपघाताची भीषण घटना घडली आहे. रामटेकगड येथून देवदर्शन आणि पर्यटन करून भंडाऱ्याकडे निघालेल्या एका कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, रामटेकगड येथून देवदर्शन आणि पर्यटन करून भंडाऱ्याकडे निघालेल्या कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने उभ्या ट्रकला मागून धडक दिल्याने कारमधील तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर ८ जण या अपघातात जखमी झाले आहेत. तर यामध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे.

Nagpur Accident News
Satara News: जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला, काही तासांतच बाप-लेकांचा मृत्यू, खळबळजनक घटना!

भंडारा जिल्ह्यातील रहिवासी राजेश भेंडारकर आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह नागपूर जिल्ह्यातील रामटेक दर्शनासाठी आले होते. रामटेक गडमंदिर येथे दर्शन करून ते आपल्या गावी परतत असताना रामटेक-भंडारा मार्गावर असलेल्या आरोली खंडाळा गावाजवळ उभा असलेल्या कंटेनर ट्रकला त्यांची कार धडकली.

अपघात इतका भीषण होता की समोरच्या सीटवर बसलेला चालक आणि महिला जखमी अवस्थेत कारमध्ये अडकून पडली होती. अपघातातील जखमींना उपचारासाठी रामटेकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर परसराम भेंडारकर यांच्यासह दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर उर्वरित जखमींवर नागपुरात उपचार सुरू आहेत.

Nagpur Accident News
Tourists Drowned In Indrayani River : मुंबईतील पर्यटकांचा ग्रुप वर्षासहलीसाठी आला होता, दोघांचा बुडून मृत्यू

यवतमाळमध्ये कारला भीषण अपघात

दरम्यान, यवतमाळमध्येही अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. यवतमाळ आर्णी ते दिग्रस रोडवरील महागावजवळ दुचाकी व कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकी वरील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

आकाश लडके,ज्ञानेश्वर पारधी,कैलास टाले आणि गोपाल पारधी सर्व राहणार चिखली कोपरा असे अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.सध्या गंभीर जखमींवर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com