Eknathn Shinde Latest News  Saam Tv
महाराष्ट्र

धर्मवीर 2 मध्ये एकनाथ शिंदेंचं बंड दाखवणार का? निर्मात्यांनी दिलं 'हे' उत्तर

धर्मवीर चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अडचणीत आलं आहे. अशातच आता धर्मवीर (Dharmaveer) चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. धर्मवीर हा चित्रपट नसून बंडाचा ट्रेलर होता का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, या चित्रपटात एकनाथ शिंदे यांना आनंद दिघे यांचा उत्तराधिकारी म्हणून दाखवण्यात आलं आहे. दरम्यान, धर्मवीर चित्रपटाच्या निर्मात्यांबरोबर साम टिव्हीने संवाद साधला तेव्हा धर्मवीर 2 (Dharmaveer Part 2) चित्रपटात एकनाथ शिंदे यांचं बंड दाखवणार का? असा प्रश्न निर्मात्यांना विचारण्यात आला. त्यावर निर्मात्यांनी नेमकं काय उत्तर दिलं पाहूयात.... (Eknath Shinde Latest News)

धर्मवीर चित्रपटात ठाणे जिल्ह्याचा सर्वात मोठा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना प्रोजेक्ट करण्यात आलं आहे. माहितीनुसार चित्रपटाच्या प्रिमिअरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मधूनच निघून गेले होते. मला दिघे यांच्या मृत्युचा सीन बघता येणार नाही असं कारण त्यांनी दिलं होतं. मात्र वास्तविक उद्धव ठाकरे यांना चित्रपटातील काही सीन्स खटकले असल्याची चर्चा होती. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचा हा सिनेमा कारण ठरतो आहे का? अशीही चर्चा सध्या सुरू आहे.

तुम्ही जर धर्मवीर चित्रपट बघितला असेल तर, त्या चित्रपटात जेव्हा आनंद दिघे हे रुग्णालयात दाखल झालेले असतात. तेव्हा राज ठाकरे हे त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात येतात. तुमच्यासारख्या शिवसैनिकाची महाराष्ट्राला गरज आहे असं म्हणत राज हे आनंद दिघे यांच्या प्रकृतीची विचारपूस करतात. शेवटच्या क्षणी जेव्हा राज ठाकरे हे रुग्णालयातून बाहेर जाण्यासाठी निघतात. तेव्हा आनंद दिघे राज यांना म्हणतात की, हिंदुत्व तुमच्या हाती आहेत. या गोष्टीमुळे देखील उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा होती. (Eknath Shinde News)

चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांना धर्मवीर हा बंडाचा ट्रेलर होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना देसाई म्हणाले की, "मला असं वाटतं हा योगायोग आहे, हा सिनेमा तयार करत असताना अशी कुठलीही गोष्ट मनात नव्हती. माझी शिंदे साहेबांशी जेव्हा भेट व्हायची तेव्हा ते याबाबत जास्त बोलले नव्हते. किंबहून त्यांच्या बोलण्यातून असं जाणवलंही नाही".

दरम्यान, धर्मवीर 2 या चित्रपटात शिंदे यांचं बंड दाखवणार का? असा प्रश्न निर्माते देसाई यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना देसाई म्हणाले की, "जेव्हा आम्ही धर्मवीर चित्रपटाचे रिलीज होण्याच्या अगोदर फायनल स्कीन दाखवलं होतं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की, यातील बऱ्याच गोष्टी वाढत आहेत. तुम्ही एवढं दाखवू नका हे योग्य नाहीये. पण स्क्रीप नुसार आम्हाला काही गोष्टी दाखवणं गरजेचं होतं. त्यामुळे त्या दाखवल्या गेल्या. आता असं झालं की, हे सगळं योगायोगाने घडलं आहे आणि याचं कनेक्शन या सिनेमासोबत जोडलं जातं आहे". असं देसाई यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना निर्माते देसाई म्हणाले की, "धर्मवीर पार्ट 2 मध्ये आता जे काही घडतं आहे हे किती असेल हे आता आम्ही सांगू शकत नाही. पार्ट 2 चा जो स्क्रीन प्ले होता, पार्ट 2 ची जी कथा होती. ही परत दिघे साहेबांच्याच अनुशंगाने होती. दिघे साहेबांचं आत्मचरित्र्य हे तीन तासांत संपणारं नाहीये. त्याला अनेक तास लागून शकतात. अजून अनेक सीन्स आमच्याकडे आहे जे पार्ट 2 मध्ये येतील. मुळात धर्मवीर पार्ट 1 इतका यशस्वी झाला आहे की, लोकांना मुळात दिघे साहेब अजून कसे होते. याबाबत पार्ट 2 बघण्याची इच्छा आहे". असं धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: नाद करा पण आमचा कुठं! वर्ल्ड चॅम्पियन भारताचा दक्षिण आफ्रिकेला दणका

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

SCROLL FOR NEXT