eknath shinde yandex
महाराष्ट्र

Eknath Shinde : शिवसेनेत अनेकांची धाकधूक वाढली, ४ जणांना धक्का बसणार? पाहा संभाव्य मंत्र्यांची यादी

Shiv Sena Eknath Shinde : शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून ९ ते १० जणांची नावे जवळपास निश्चित मानली जात आहेत. मागील मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Shiv Sena Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा शपथविधी शनिवारी होणार आहे. राजभवनात दुपारी १२ वाजता शपथविधी होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची मंत्रि‍पदाची यादी निश्चित झाली आहे. भाजपला २० पेक्षा जास्त, तर शिवसेनेला १३ आणि राष्ट्रवादीला १० खाती मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून आपली यादी दिल्लीला पाठवल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. दुसरीकडे शिवसेनेची यादीही निश्चित झाली आहे. शिवसेनेकडून अनेक विद्यमान खासदारांना धक्का दिल्याचे सूत्रांकडून समजतेय.

एकनाथ शिंदे यांच्याकडून शनिवारी ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. यामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. नव्या मंत्रिमंडळात धक्कातंत्र भाजपकडून वापरण्यात येईल, असा अंदाज वर्तवलाय जातोय. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी अनेक माजी मंत्र्यांची धाकधूक वाढवणारी ठरणार आहे. पहिल्या यादीत अनेकांची नावे नसल्याचे दिसतेय. तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, संजय राठोड, अश्या अनेकांना धक्का बसण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

संभाव्य मंत्र्यांची यादी भाजपच्या हाती लागली आहे. त्यामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्याचे दिसतेय. तर मागील मंत्रालयातील काही चेहऱ्यांना वगळण्यात आल्याचे दिसतेय.

एकनाथ शिंदे - उपमुख्यमंत्री

उदय सामंत

शंभूराजे देसाई

गुलाबराव पाटील

दादा भुसे

प्रताप सरनाईक

संजय शिरसाठ

भरत गोगावले

आशिष जयस्वाल

योगेश कदम (राज्यमंत्री)

विजय शिवतारे (राज्यमंत्री)

कोल्हापूर - आबिटकर किंवा याद्रावकर (राज्यमंत्री)

कोणती खाती मिळणार?

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला १२-१३ खाती येण्याची शक्यता आहेत. एकनाथ शिंदे यांना नगरविकास खाते मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपकडून नगरविकास खात्यावर दावा करण्यात आला होता. तर शिवसेनेकडून गृह खाते मागण्यात आले होते. पण अखेर शिवसेनेला नगरविकास खात्यावरच समाधान मानावे लागेल.नगरविकास मंत्रालयासह सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, उथ्पादन शुल्क, परिवहन, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंधारण, पणन, शालेयशिक्षण ही खाती शिवसेनेकडे राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय विधान परिषदेचे नेतेपद आणि सभापतीपदही शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

Chana Koliwada: स्ट्रीट स्टाइल चटपटीत चना कोळीवाडा, संध्याकाळची भूक मिनिटांत गायब

Maharashtra Live News Update: पुणे शहराला लवकरच मिळणार ५ नवीन पोलिस ठाणे

Food Safety Tips: कोणत्या भाज्या पुन्हा गरम करून खाऊ नयेत? अन्यथा...

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समर्थकांसह राजीनामा

SCROLL FOR NEXT