Jalna bus service saam tv
महाराष्ट्र

Gen alpha club: 'बस सुरू करा, नाहीतर आमचं शिक्षण थांबेल'; जालन्यातील विद्यार्थिनींचा थेट रस्त्यावर उतरून सवाल

Jalna school girls: जालना तालुक्यातील जळगाव परिसरातील ५० ते ६० विद्यार्थिनींना मानव विकास मिशनची बससेवा बंद असल्याने शाळेसाठी पाच ते सहा किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. पायी किंवा खासगी वाहनाने शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

जालना तालुक्यातील जळगाव आणि परिसरातील ५० ते ६० विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय. मानव विकास मिशनची बससेवा बंद असल्याने नववी आणि दहावीच्या मुलींना कधी पायी, तर कधी खासगी वाहनातून पाच ते सहा किलोमीटरचा प्रवास करून छत्रपती शिवाजी हायस्कूल गाठावं लागत आहे. त्यामुळे विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये नाराजी आहे.

जळगाव याठिकाणाहून अनेक मुली शिक्षणासाठी बाहेर जातात. मात्र गावातून शाळेसाठी नियमित बस नसल्याने त्यांना रोजच त्रास सहन करावा लागतोय. सरकारकडून मुलींचं शिक्षण सुरू राहावं यासाठी मानव विकास मिशनच्या माध्यमातून बससेवा दिली जाते. मात्र जळगावमध्ये ही बस सुरू नसल्याने विद्यार्थिनींची गैरसोय होतेय.

पालक आणि शाळेची मागणी

बस सुरू करण्यासाठी जळगावमधील पालक आणि शाळेच्या वतीने जालना आगार प्रमुखांना अनेकदा निवेदन देण्यात आलंय. मात्र निवेदन देऊनही अद्याप बससेवा सुरू झालेली नाही. जळगावमध्ये पूर्वीचीच मानव विकास मिशनची बस पुन्हा सुरू करावी अशी मागणी पालक आणि शाळेने केलीये.

याबाबत शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास वायाळ यांनी सांगितलं की, मानव विकासची बस सुरू नसल्याने नववी आणि दहावीच्या ५० ते ६० मुलींना शिक्षणासाठी दररोज पायी ये-जा करावी लागते. याबाबत आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आलं असून जुनीच बस जळगावला पाठवावी, अशी मागणी केलीये. विद्यार्थिनींचे होणारे हाल लक्षात घेता प्रशासनाने लवकरात लवकर बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC च्या 800 अभियंत्यांची उचलबांगडी? ठाण मांडलेल्यांच्या पुढील महिन्यात बदल्या

दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकारची धावाधाव, राज्यात लवकरच दुष्काळ जाहीर होणार

देहूगावात थरार! शेतजमिनीच्या वादातून गरोदर पत्नीचा खून; पतीने इमारतीवरून मारली उडी, संपूर्ण परिसर हादरला

Heart Attack : जिममध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' ६ लक्षणे, दुर्लक्ष करू नका नाहीतर....

Maharashtra News Live Update: अर्धा तासाचा पावसामध्ये भिवंडी शहरात अनेक ठिकाणी साचले पाणी

SCROLL FOR NEXT