Shiv Sena workers protest at Buldhana Collector Office demanding suspension of SP Nilesh Tambe saam tv
महाराष्ट्र

पोलीस आधीक्षकांचं निलंबन करा, आमदारांचा मुलगा बसणार उपोषणाला

Buldhana Protest Demand Suspension Sp Nilesh Tambe Hunger Strike: बुलढाणा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र पृथ्वीराज गायकवाड यांनी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास १ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

Omkar Sonawane

बुलढाणा जिल्ह्यात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, हजारो अल्पवयीन मुलींची तस्करी,गोवंश तस्करी,जळगाव जामोद बनावट हत्याकांड प्रकरणात पोलिस आणि गृह विभागाची झालेली बदनामी या सर्व कारणांना बुलढाणा जिल्ह्याचे अकार्यक्षम पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे जबाबदार असून ते जिल्ह्यात आल्यापासून मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली असल्याचा दावा करत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र पृथ्वीराज गायकवाड आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच शेकडो शिवसैनिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

बुलढाणा जिल्ह्याचे अकार्यक्षम पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली. जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड घडवून पोलीस अधीक्षकांनी गृह विभाग व पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली आहे.

याशिवाय राजुरा धरण परिसरात अज्ञात महिलेच्या मारेकऱ्यांना शोधण्यास बुलढाणा पोलीस अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे तात्काळ पोलीस अधीक्षकांचे निलंबन करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. उद्या दिनांक १ जुलैपासून आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र पृथ्वीराज गायकवाड हे शिवसेना जिल्हाप्रमुख व शेकडो शिवसैनिकांसह बुलढाणा येथे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. या प्रकरणाची आता गृह विभाग काय दखल घेते आणि पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे निलंबन होते का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोटावरची चरबी वाढणे म्हणजे फक्त लठ्ठपणा नाही; तर 'या' आजारांचा उद्भवू शकतो धोका

Maharashtra News Live Update: डोंबिवली एमआयडीसी निवासीत झाडे कोसळण्याचे सत्र कायम

चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळेच्या बसवर झाड कोसळलं, 10 विद्यार्थी जखमी, एकाचा मृत्यू

Maharashtra Rain Alert: राज्यात 5 दिवस अतिमुसळधार पाऊस; कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट, मुंबई-पुण्यातील हवामानाचा अंदाज काय?

राज्यात मासेमारी १५ ऑगस्टपर्यंत बंद, जाणून घ्या का वाढवली सरकारने मासेमारी बंदी?

SCROLL FOR NEXT