Ravikant Tupkar Protest Sindkhed Raja:  Saamtv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar News: 'रक्तदाब वाढला, वजन घटलं...' रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली, कृषीमंत्र्यांच्या आवाहनानंतरही उपोषणावर ठाम!

Ravikant Tupkar Protest Sindkhed Raja: आंदोलनाच्या चौथ्या दिवशी तुपकर यांची प्रकृती खालावली असून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी फोनवरुन संवाद साधत उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. मात्र ठोस आश्वासन दिल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव| बुलढाणा, ता. ७ सप्टेंबर

Ravikant Tupkar Hunger Strike 4thday: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे गेल्या चार दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत. रविकांत तुपकर यांच्या सिंदखेड राजा येथे सुरू असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी तुपकर यांची प्रकृती खालावली असून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी फोनवरुन संवाद साधत उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. मात्र ठोस आश्वासन दिल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

रविकांत तुपकरांच्या उपोषणाचा ४था दिवस

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी, सोयाबीन, कापसाला दरवाढ द्यावी, अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी यासह विविध मागण्या घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर हे 4 सप्टेंबरपासून सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. आंदोलनाला तिसरा दिवस उलटला तरी याची राज्य सरकारने दखल घेतली नव्हती. आज या आंदोलनाचा चौथा दिवस असून रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.

प्रकृती खालावली!

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी रविकांत तुपकर यांच्या शरिरातील शुगर लेवल कमी झाली असून शुगर लेव्हलही कमी झाली आहे. आता या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली असून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी तुपकर यांच्याशी फोनवरुन संवाद साधला, तसेच उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र धनंजय मुंडे यांच्या विनंतीनंतरही तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.

कृषीमंत्र्यांचा फोन, उपोषणावर ठाम!

"तोंडी आश्वासनांना आम्ही शेतकरी कंटाळलो आहे, आता रिझल्ट द्या असे म्हणत ठोस आश्वासन दिल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. तसेच सरकारला जर माझा जीव घ्यायचा असेल तर मी त्यासाठी तयार आहे. आज गणपती आगमन असल्याने शेतकरी आंदोलन करणार नाही. मात्र उद्या राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरतील," असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT