buldhana police took charge of ravikant tupkar on eve of mantralaya andolan saam tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar: मंत्रालयाचा ताबा घेऊ इच्छिणारे रविकांत तुपकर पोलीसांच्या ताब्यात, कार्यकर्ते आक्रमक

संजय जाधव

Buldhana News : कापसाला व सोयाबीनला योग्य हमी भाव मिळावा यासाठी 29 नोव्हेंबरला मंत्रालयात आंदाेलन करु इच्छिणा-या शेतकरी नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar latest marathi news) यांना आज (शनिवार) काही वेळापूर्वी बुलडाणा पोलीसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेतलले. तुपकर यांना शहर पोलीस ठाण्यात आणले गेले आहे.  (Maharashtra News)

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २० नोव्हेंबरला बुलडाण्यात एल्गार महामोर्चा काढला होता. जिल्हाभरातून हजारो शेतकरी बुलडाण्यात धडकले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर २८ नोव्हेंबरला मुंबईला धडक देऊन २९ नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा तुपकर यांनी या मोर्चातून दिला होता.

या आंदोलना पासून परावृत्त करण्यासाठी बुलडाणा पोलीसांनी शुक्रवारी रविकांत तुपकर यांनी कलम 149 अंतर्गत नाेटीस बजावली हाेती. त्यावेळी अशा नाेटीसांना मी भीक घालत नाही अशी प्रतिक्रिया तुपकर यांनी माध्यमांना दिली हाेती.

दरम्यान आज बुलडाणा शहर पोलीसांनी दुपारच्या सुमारास शहरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर रविकांत तुपकर यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यांना शहर पाेलीस ठाण्यात आणण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुपकर यांना पाेलीसांनी ताब्यात घेतल्याची बातमी वा-यासारखी शहर व जिल्ह्यात पसरली. पाेलीसांनी तुपकरांना ताब्यात घेतल्याचे पडसाद जिल्ह्यात उमटू लागले आहेत. चिखली तालुक्यात जालना खामगाव महामार्गावर कार्यकर्त्यांकडून टायर जाळून पाेलीसांच्या कृतीचा निषेध नाेंदवला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून यलो अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

Horoscope Today : धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल, मानसिक ताण जाणवेल; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT