Shreya Maskar
सकाळी घाईगडबडीत डबा बनवायचा असेल तर चटपटीत बेसनाचा पोळा करा. बेसनाचा पोळा भाजीला उत्तम पर्याय आहे. लहान मुलं आवडीने खातील.
बेसनाचा पोळा बनवण्यासाठी बेसन, मसाले, रवा, तांदळाचे पीठ, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हळद, तिखट, धणे-जिरे पूड, मीठ , हिरवी मिरची, लसूण इत्यादी साहित्य लागते.
बेसनाचा पोळा बनवण्यासाठी सर्वप्रथम बारीक रवा , तांदळाचे पीठ बाऊलमध्ये मिक्स करून घ्या.
या पीठात बेसन, मीठ, हळद, तिखट, धणे-जिरे पूड आणि इतर मसाले टाकून एकजीव करा. मसाल्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार टाका.
त्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर , लसूण टाका. तसेच तुम्ही यात इतर आवडीच्या भाज्या टाकू शकता. यामुळे बेसनाचा पोळा खूप हेल्दी बनेल.
मिश्रण सतत ढवळत रहा. मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या. भिजवलेले पीठ 10-15 मिनिटे बाजूला ठेवून द्या. जेणेकरून ते चांगले मुरेल.
आता पॅनवर तेल टाकून बेसनाचे मिश्रण गोलाकार पसरवून घ्या. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. पोळा दोन्ही बाजूंनी गोल्डन फ्राय आणि कुरकुरीत करा.
पुदिन्याच्या चटणीसोबत बेसनाचा पोळ्याचा आस्वाद घ्या. तसेच तुम्ही चपाती आणि भातासोबत देखील हा खाऊ शकता.