Chutney Recipe : थंडीत जेवणाच्या पानात असायलाच हवी 'ही' चटणी, मजबूत हाडांसाठी फायदेशीर

Shreya Maskar

हिवाळ्यात जेवण

हिवाळ्यात चांगले पौष्टिक जेवण जेवा. थंडीत हाडांचे आरोग्य बिघडते. त्यामुळे थंडीत मजबूत हाडांसाठी जेवताना एक चमचा तिळाची चटणी खा.

Chutney | yandex

तिळाची चटणी

तिळाची चटणी बनवण्यासाठी पॅनमध्ये तीळ टाकून मंद आचेवर हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या. तीळ भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवून द्या.

Sesame Seed | yandex

सुकं खोबरं

त्यानंतर किसलेले सुकं खोबरं पॅनमध्ये गोल्डन फ्राय करा आणि ताटात काढून घ्या.

Dry Coconut | yandex

लसूण

पॅनमध्ये तूप टाकून जिरे आणि लसूण पाकळ्या परतवून घ्या. तुम्ही यात शेंगदाणे देखील भाजून टाकू शकता. कच्चे शेंगदाणे वापरा.

Garlic | yandex

पेस्ट बनवा

मिक्सरच्या भांड्यात भाजलेले तीळ, खोबरं, लसूण, जिरं, शेंगदाणे, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून जाडसर चटणी वाटून घ्या. पावडर जास्त बारीक होणार नाही याची काळजी घ्या.

Chutney | yandex

दाणेदार चटणी

तिळाची चटणी थोडी दाणेदार किंवा जाडसर ठेवावी. जेणेकरून खायला अधिक चवदार लागते. गरमागरम भाकरी, भातासोबत तुम्ही चटणीचा आस्वाद घेऊ शकता.

Chutney | yandex

चटणी स्टोर करा

तयार तिळाची चटणी हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवा. जेणेकरून ती जास्त काळ टिकते. चटणी फ्रिजमध्ये ठेवा.

Chutney | yandex

पाणी

तुम्हाला जर चटणी पातळ पेस्ट सारखी हवी असेल तर यात तुम्ही कोमट पाणी मिक्स करा. सकाळी डब्यासाठी ही रेसिपी पटकन उपयोगी येईल.

water | yandex

NEXT : चटपटीत चाट खा अन् वजन कमी करा, आताच लिहून घ्या 'ही' सीक्रेट रेसिपी

Weight Loss | saam tv
येथे क्लिक करा...