Shreya Maskar
चणा चाट बनवण्यासाठी रताळे, काळे चणे, काकडी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चटणी, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, पनीर, मका, ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
चणा चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम रताळ्याचे तुकडे आणि काळे चणे शिजवून घ्या. रताळ्याचे साल काढून कुकरमध्ये उकडवा.
त्यानंतर उकडलेले चणे आणि शिजलेले रताळे थंड करून बाऊलमध्ये मॅश करा. 4-5 शिट्ट्यांमध्ये चणे आणि रताळे चांगले शिजेल.
मॅश केलेल्या मिश्रणात काकडी, कांदा, टोमॅटो बारीक चिरून टाका. काकडीचे साल काढा. तुम्ही यात उकडलेले मक्याचे दाणे देखील टाकू शकता.
त्यानंतर यात चाट मसाला, काळी मिरी, कोथिंबीर चटणी टाकून चणा चाट एकजीव करून घ्या. यात तुम्ही पनीरचे छोटे तुकडे टाकू शकता.
त्यानंतर यात सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया टाका. यात सर्वात जास्त पौष्टिक घटक असतात. जे वजन कमी करण्यास तुम्हाला मदत करतात.
त्यानंतर तुम्हाला हवे असतील तर यात भाजलेले ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता. काजू, बदाम , पिस्ता वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन बी ६ असते. काळे चणे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच झटपट वजन कमी करण्यासाठी हा पदार्थ नक्की खा.