Shreya Maskar
वाटपाची डाळ बनवण्यासाठी चण्याची डाळ , मूग डाळ , टोमॅटो, हिरवी मिरची, मोहरी , जिरे, हिंग , कढीपत्ता, लसूण, ओलं खोबरे, कोथिंबीर, मीठ इत्यादी साहित्य लागते.
वाटपाची डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम चण्याची डाळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर काही वेळ पाण्यात भिजत ठेवा.
कुकरमध्ये कपभर पाण्यासोबत टोमॅटो, मिरचीचे तुकडे आणि स्वच्छ केलेली डाळ टाकून शिजवून घ्या. ३-४ शिट्ट्यांमध्ये पदार्थ चांगले शिजतील.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता चांगले तडतडू द्या. फोडणी गोल्डन फ्राय करा. यामध्ये लसूणची पेस्ट टाका.
मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचा किस, जिरे, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून वाटण तयार करा. त्यानंतर तयार वाटण फोडणीत मिक्स करा.
आता यात हळद आणि शिजलेली डाळ टाकून रवीने मिक्स करा. लक्षात ठेवा गॅस मध्यम आचेवर ठेवून द्या. डाळ सतत ढवळत राहा. जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाही.
शेवटी डाळीला चांगली एक उकळी आल्यावर त्यात मीठ आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करा. डाळ जास्त पातळ आणि घट्ट होणार नाही याची, काळजी घ्या.
गरमागरम भात आणि वाटपाची डाळ याचा आस्वाद घ्या. हा पदार्थ कोकणात आवर्जून बनवला जातो. याची चटपटीत चव लोकांना खूप आवडते.