Shreya Maskar
हिवाळ्यात जेवताना काही चटपटीत खावेसे वाटत असेल तर हिरव्या मिरचीचे इन्स्टंट लोणचे बनवा. सिंपल साहित्य आणि कृती लिहून घ्या.
हिरव्या मिरचीचे इन्स्टंट लोणचे बनविण्यासाठी हिरवी मिरची, मीठ, हळद, तेल, जिरे, बडीशेप, धणे पावडर, मोहरी आणि लिंबू साहित्य लागेल. यांचे योग्य प्रमाण घ्या.
हिरव्या मिरचीचे लोणचे बनविण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घ्या त्यावर चाळणी ठेवा आणि त्यात मिरची वाफवून घ्या. लोणच्यासाठी छोट्या मिरच्या वापरा.
दुसरीकडे मिक्सरला जिरे, मोहरी आणि बडीशेप जाडसर बारीक करून घ्या. तुम्ही यात तुमच्या आवडीचे पदार्थ देखील टाकू शकता.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मसाल्याची पेस्ट, हळद, मीठ आणि धणे पावडर टाकून मिक्स करा. थोड्या वेळाने गॅस बंद करून पेस्ट थंड होऊ द्या.
वाफवलेली मिरची थंड करून त्याचे छोटे काप करा. तसेच ती उभी चिरा. आता यात लिंबाचा रस आणि मीठ टाकून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. त्यानंतर तयार केलेला मसाला टाकून मिक्स करून घ्या.
तुम्ही यात थोडा गूळ देखील टाकू शकता. लोणचे रात्रभर झाकून मुरण्यासाठी ठेवून द्या. सकाळी तयार लोणचे हवाबंद डब्यात भरून ठेवा. जे चांगले टिकेल.
तयार लोणचे तुम्ही 1-2 आठवडे चांगले टिकेल. तुम्ही गरमागरम भातासोबत याचा आस्वाद घ्या.