Shreya Maskar
आजकाल आपण पाणीपुरी घरीच बनवतो. मात्र काही लोक पाणीपुरीचा मसाला, भाजी, पाणी घरी बनवतात आणि पुरी विकत घेऊन येतात. पण तुम्ही पुऱ्या देखील घरी बनवू शकता.
पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी रवा, कणिक, पाणी, मीठ, तेल, जिरे इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यांचे योग्य प्रमाण घ्या, जेणेकरून पुरी छान बनेल.
पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी परातीत वाटीभर रवा घ्या. पुरीसाठी बारीक रवा वापरा. जेणेकरून तो चांगला फुलेल.
रव्यात गव्हाचे पीठ, पाणी , तेल, जिरे मिक्स करून चांगली कणिक मळून घ्या. पीठ जास्त घट्ट किंवा सैल मळू नका.
आता पीठावर ओला सुती कपडा ठेवून तासभर पीठ तसेच ठेवा. जेणेकरून पीठ चांगले मुरेल आणि पाणीपुरीची पुरी टम्म फुगेल.
त्यानंतर कणिकेचे छोटे गोळे करून पुरी लाटून घ्या. पुरी जास्त पातळ आणि जाड लाटू नका. मध्यम आकाराच्या बनवा. चांगल्या तळल्या जातात.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तयार पुऱ्या खरपूस गोल्डन फ्राय करा. पुऱ्या हवा बंद डब्यात स्टोर करा. जेणेकरून त्या नरम होणार नाही.
तुम्ही पुऱ्या घरी बनवत असल्यामुळे तुम्हाला त्यात कोणता फ्लेवर टाकायचा असेल तर टाकू शकता. उदा. तर तिखट पुऱ्या हव्या असतील तर मसाला पीठात मसाला टाका.