Shreya Maskar
हिवाळ्यात हिरवीगार फरसबी भाजी बाजारात येते. मात्र लहान मुलांना फरसबी भाजी आवडत नसेल तर तुम्ही चटपटीत चटणी बनवू शकता.
फरसबीची चटणी बनवण्यासाठी फरसबी, लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ, तेल, आमचूर पावडर, पाणी, शेंगदाण्याचा कूट इत्यादी साहित्य लागते.
फरसबीची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम हिरवीगा फरसबी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसा आणि व्यवस्थित तोडून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात फरसबी, लसूण आणि हिरव्या मिरच्या कुरकुरीत फ्राय करा.
फ्राय फरसबीचे मिश्रण, मीठ, आमचूर पावडर आणि पाणी मिक्सरमध्ये टाकून एक पेस्ट तयार करा. अशा प्रकारे चटपटीत फरसबीची चटणी तयार झाली.
फरसबीच्या चटणीची चव वाढवण्यासाठी तुम्ही यात शेंगदाण्याचा कूट देखील टाकू शकता. यामुळे चटणी अधिक चवदार बनेल. तसेच मुलं आवडीने खातील.
तयार फरसबीची चटणी तुम्ही भात किंवा भाजीसोबत आवडीने खा. गरमागरम भातासोबत चटणीची चव आणखी वाढेल.
फरसबीमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स, फायबर असते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. हाडे मजबूत होतात. कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.