Pongal Recipe : साउथ इंडियन स्टाइल पोंगल कधी खाल्ला आहात का? मकर संक्रांतीला 'ही' रेसिपी एकदा ट्राय कराच

Shreya Maskar

पोंगल

पोंगल हा दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये, मकर संक्रांतीच्या (जो तिथे पोंगल म्हणून साजरा होतो) निमित्ताने बनवला जाणारा एक गोड, पारंपारिक पदार्थ आहे. पोंगल ही एका प्रकारची तांदळाची खीर आहे.

Pongal Recipe | yandex

पोंगलचे प्रकार

पोंगलचे मुख्य दोन प्रकार आहे. १) स्वीट पोंगल (गोड) आणि २) वेन पोंगल (खारट) आज आपण गोड पोंगल बनवण्याची रेसिपी जाणून घेऊयात.

Pongal Recipe | yandex

पोंगल रेसिपी

पोंगल बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये तूप टाकून त्यात धुतलेले तांदूळ आणि मुगाची डाळ शिजवून घ्या. मध्यम आचेवर फ्राय करा.

Pongal Recipe | yandex

दूध

यात वाटीभर दूध आणि पाणी टाकून ४-५ शिट्ट्या होईपर्यंत भात-डाळ शिजवा. जेणेकरून भात चांगला मऊ होईल.

Milk | yandex

गूळ

दुसरीकडे पॅनमध्ये गूळ आणि पाणी टाकून घट्ट पाक तयार करा. लक्षात ठेवा पाक जास्त घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

Jaggery | yandex

भात शिजवा

यात कुकरमधील भात-डाळीचे शिजवलेले मिश्रण मिक्स करा. तुम्ही यात आवडत असेल तर ओलं खोबरं देखील टाकू शकता.

Pongal Recipe | yandex

ड्रायफ्रूट्स

दुसऱ्या पॅनमध्ये तूप, काजू, मनुका, बदाम, पिस्ता टाकून परतून घ्या आणि ते भाताच्या मिश्रणात टाका.

Dry fruits | yandex

वेलची पावडर

त्यानंतर यात वेलची पावडर, चिमूठभर मीठ टाकून एक वाफ काढा. जेणे करून खीर चांगली शिजेल. यंदा मकर संक्रांतीला हा पदार्थ आवर्जून बनवा.

Cardamom powder | yandex

NEXT : हिरव्यागार मेथीची खुसखुशीत वडी; जेवणाची वाढेल लज्जत, रेसिपी आहे खूपच सोपी

Methi Vadi Recipe | yandex
येथे क्लिक करा...