Shreya Maskar
मेथीची वडी बनवण्यासाठी मेथी, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, बेसन, तांदळाचे पीठ, हळद, हिंग, धणे पावडर, लाल तिखट मसाला, जिरे पावडर, तीळ, ओवा, मेथी, मीठ, पाणी इत्यादी साहित्य लागते.
मेथीची वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घ्या. त्यानंतर मेथी थोडी कोरडी करा.
त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर यांची बारीक पेस्ट तयार करा. तिखटाचे प्रमाण तुमच्यावर आहे. त्यानुसार मिरची घ्या.
मोठ्या बाऊलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, हळद, हिंग, धणे पावडर, लाल तिखट मसाला, जिरे पावडर, तीळ, ओवा, मीठ टाकून मिक्स करा.
आता यात चिरलेली बारीक मेथी, तेल. कोथिंबीर पेस्ट घालून चांगले एकजीव करा. त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून चांगले पीठ मळा.
मेथीच्या मळलेल्या पाठाचे रोल तयार करून ते प्रेशर कुकरमध्ये १० ते १५ मिनिटे वाफवून घ्यावे. जेणेकरून वडी चांगली बनेल.
आता वाफवलेल्या मेथीच्या रोलच्या छोट्या वड्या पाडून घ्या. मंद आचेवर मेथीची वड्या खरपूस तळून घ्या.
खुसखुशीत मेथीची वडी पुदिन्याच्या चटणीसोबत खा. तमचे पाहुणे खुश होतील आणि तुमच्या रेसिपीचे कौतुक करतील.