Shreya Maskar
काळा चणा मसाला बनवण्यासाठी काळे चणे, पाणी, तमालपत्र, मीठ, तूप, आलं, हिरवी मिरची, लाल तिखट, जिरे पावडर, हळद, धणे पूड, काळी मिरी पावडर, काळे मीठ, आमचूर पावडर, कसुरी मेथी, कोथिंबीर, जिरं, हिंग, गरम मसाला इत्यादी साहित्य लागते.
काळा चणा मसाला बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये पाणी टाकून त्यात काळे चणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी कुकरमध्ये चणे चांगले शिजवून घ्या.
चणे शिजवताना यात पाण्यासोबत तमालपत्र, चवीनुसार मीठ, तूप घाला. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यात काही मसाले आणि १-२ वेलची देखील टाकू शकता.
मिक्सरच्या भांड्यात आल, हिरव्या मिरच्या, लाल तिखट, जिरं पावडर, हळद, धणे पूड, काळी मिरी पावडर, आमचूर पावडर, कसुरी मेथी, कोथिंबीर घालून पेस्ट बनवा.
पॅनमध्ये तूप, जिरे, हिंग, तयार मसाल्यांची पेस्ट घालून मिश्रणाला तेल सुटूपर्यंत भाजून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा.
यात शिजवलेल्या काळ्या चण्याचे पाणी घालून मिश्रणाला एक उकळी येऊ द्या. पाण्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात.
उकळी आल्यानंतर त्यात शिजवलेले काळे चणे, चवीनुसार मीठ, गरम मसाला घालून चमच्याने चांगले मिक्स करा. जेणेकरून मसाला सर्व बाजूला लागेल.
शेवटी भाजी शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर भुरभूरवा. त्यानंतर तुम्ही यात वरून लिंबू देखील पिळा.