Shreya Maskar
मकर संक्रांती काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मकर संक्रांतीला खास पाहुण्यांसाठी तिळाची बर्फी बनवा. हा पदार्थ तुमच्या कुटुंबाला नक्कीच आवडेल.
तिळाची बर्फी बनवण्यासाठी तीळ, तूप, गव्हाचे पीठ, गूळ, खसखस, वेलची पावडर, सुंठ पावडर, जायफळ आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
तिळाची बर्फी बनवण्यासाठी पॅनमध्ये तीळ भाजून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवा. त्यानंतर तीळ थंड झाले की, मिक्सरमध्ये टाकून त्याचा कूट करून घ्या.
पॅनमध्ये तूप टाकून त्यात गव्हाचे पीठ परतून घ्या. यात तिळाचा कूट टाकून मिश्रण एकजीव करा. कोणत्याही गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.
आता या मिश्रणात गूळ, सुंठ पावडर, जायफळ आणि तुमच्या आवडत्या ड्रायफ्रूट्सचे बारीक काप टाकून व्यवस्थित हलवून घ्या.
गॅस बंद करून यात वेलची पूड टाका आणि सर्व मिश्रण हलके मिक्सरमध्ये वाटून घ्या.
आता एक ताटाला तूप लावून तयार मिश्रण त्यावर चांगले पसरवून घ्या. त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडून घ्या. हे ५-६ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा.
तुम्ही यात साखरे ऐवजी गूळ वापरू शकता. तसेच तिळाच्या बर्फीला रंग येण्यासाठी थोडे केशर देखील टाकू शकता.