Shruti Vilas Kadam
फुल क्रीम दूध, लिंबाचा रस/व्हिनेगर, साखर, पाणी, वेलची पूड, गुलाबपाणी, खोबऱ्याचा कीस किंवा ड्रायफ्रूट्स.
दूध उकळवून त्यात लिंबाचा रस घालावा. दूध फाटल्यानंतर गाळून छेना थंड पाण्याने धुवावा.
छेना घट्ट पण मऊ होईपर्यंत हाताने चांगला मळावा, गाठी राहू देऊ नयेत.
मळलेल्या छेन्याचे छोटे लांबट गोळे तयार करा.
कढईत साखर व पाणी उकळवून हलकी पाकळी तयार करा.
तयार गोळे पाकळीत टाकून मंद आचेवर १५–२० मिनिटे शिजवा.
थंड झाल्यावर वेलची पूड, गुलाबपाणी घालून खोबऱ्याचा कीस किंवा ड्रायफ्रूट्सने सजवा.