Shruti Vilas Kadam
एक पिकलेली केळी घ्या. पिकलेली केळी त्वचेसाठी अधिक फायदेशीर असते कारण ती सहज मॅश होते.
केळी सोलून काट्याने किंवा वाटीत नीट मॅश करा, गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या.
१ चमचा मध घालावा. यामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि ग्लो येतो.
१ चमचा दही मिसळल्यास त्वचा थंड राहते आणि अतिरिक्त तेलकटपणा कमी होतो.
सर्व घटक नीट मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
स्वच्छ चेहऱ्यावर ही पेस्ट समान प्रमाणात लावा. डोळ्यांचा भाग टाळा.
फेस पॅक सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा.