Shruti Vilas Kadam
आठवड्यातून २ वेळा नारळ तेलात थोडे बदाम तेल मिसळून केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत मसाज करा. केसांना पोषण मिळते.
दही आणि मध मिसळून केसांवर लावा. २० मिनिटांनंतर धुवा. केस मऊ आणि रेशमी होतात.
अंड्याचा पांढरा भाग केसांना प्रथिने देतो. आठवड्यातून एकदा वापरल्यास कोरडेपणा कमी होतो.
ताजे कोरफड जेल केसांवर लावल्यास फ्रिझीनेस कमी होतो आणि केसांना नैसर्गिक ओलावा मिळतो.
पिकलेली केळी आणि ऑलिव्ह तेल एकत्र करून लावल्यास केस मजबूत व गुळगुळीत होतात.
भात धुतलेले पाणी केस धुण्यासाठी वापरल्यास केस चमकदार व सरळ दिसतात.
गरम पाणी टाळा, सौम्य शॅम्पू वापरा आणि जास्त केमिकल उत्पादने वापरू नका.