Buldhana News Youth Beaten Inside Police Station Saam Tv
महाराष्ट्र

न्याय मागणाऱ्या तरूणाला पोलिसांनी चोपलं; युवकाकडून विष पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

Buldhana News Youth Beaten Inside Police Station: बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार. न्याय मागणाऱ्या युवकाला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण. संतप्त होऊन युवकानं विष प्राशन करून आत्महत्येचा केला प्रयत्न.

Bhagyashree Kamble

  • न्याय मागणाऱ्या युवकास पोलिस स्टेशनमध्ये मारहाण

  • न्याय मिळत नसल्यानं युवकाने विष प्राशन करत केला आत्महत्येचा प्रयत्न

  • विष घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

न्याय मिळत नसल्यानं युवकानं विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुलढाण्यातून उघडकीस आली आहे. चोरीला गेलेली बैलजोडी परत मिळावी, यासाठी तरूणानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करूनही कारवाई होत नसल्याने तरूणानं एसपी कार्यालय गाठले. यामुळे पोलिसांनी संतापून त्याला बेदम मारहाण केली. तरूणानं घरी परतल्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओही समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पवन जायभाये असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. हा तरूण लिंगा देवखेड येथील रहिवासी आहे. या तरूणाची बैलजोडी चोरीला गेली होती. त्यानं या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. मात्र, तक्रार दाखल करूनही तरूणाला न्याय मिळत नव्हता. पोलिसांकडून कारवाई केली जात नव्हती.

कारवाई होत नसल्यामुळे पवनने एसपी कार्यालय गाठले. तरूणाने तक्रार केल्यामुळे ठाणेदार संजय मातोंडकर याने फिर्यादी युवकाला बोलावून पोलिस स्टेशनमध्ये बेदम मारहाण केली. तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकीही दिली. त्यामुळे सायंकाळी घरी गेल्यावर फिर्यादी युवक पवन जायभाये याने विष प्राशन केले.

तसेच विष प्राशन करतानाचा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ समोर येताच तरूणाला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले. दरम्यान, या प्रकरणावर ठाणेदार संजय मातोंडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मारहाणीचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच, 'पवन जायभाये आणि त्याचे वडील यांनी मिळून लोकांचा कापूस पैसे न दिल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे', असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

Shukra Asta 2025: धन दाता शुक्र होणार अखेर अस्त; या राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

Maharashtra Politics: अजित पवारांनी मोठा डाव टाकला; एकाच दिवशी भाजप आणि उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का

Mumbai Travel : 2025 ला निरोप अन् नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत, मुंबईकरांनो न्यू इयरला 'या' ठिकाणी नक्की जा

SCROLL FOR NEXT