Crime News Saam tv
महाराष्ट्र

लग्नात नाचताना धक्का लागला म्हणून आदिवासी तरुणाची हत्या

लग्नात नाचताना धक्का लागला म्हणून आदिवासी तरुणाची हत्या

संजय जाधव

बुलढाणा : जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील संग्रामपूर तालुक्यातील हाडियामहाल या गावात एका 20 वर्षीय तरुणाला लग्नात नाचताना धक्का लागला. या कारणावरून काही जणांना मारहाण झाली. यामध्‍ये तरुणाचा मृत्‍यू (Death) झाल्‍याची घटना घडली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (buldhana news young man killed as he was hit while dancing at a wedding)

हाडियामहाल गावात १७ मेस विवाह सोहळा होता. या विवाह (Marriage) सोहळ्याच्‍या वरातीत सर्वजण नाचण्यात दंग होते. परंतु नाचताना एकमेकांना धक्‍का लागला. यात वरातीतच वाद झाला. यानंतर वादाचे रूपांतर (Crime News) मारहाणीत होवून गावातीलच चार ते पाच जणांना मारहाण झाली होती. यात रवी वारकेला हा युवक गंभीर जखमी झाला होता. त्याला अकोला येथील सर्वोपचार केंद्रात उपचार सुरू होते. दरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. तर अन्‍य तीन जणांवर उपचार सुरू आहेत.

तगडा पोलिस बंदोबस्‍त

सदर घटनेने गावात तणाव निर्माण झाला असून हाडियामहाल या आदिवासी गावात सोनाळा पोलिसांनी (Police) मोठा बंदोबस्त लावला आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून सोनाळा पोलीसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT