Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गांवर पाळावी लागणार वेग मर्यादा; एक किमी अंतरावर बसणार स्पीड सेन्सर कॅमेरा, उल्लंघन केल्यास दंड

Buldhana News : नागपूर ते मुंबई ७०१ किलोमीटर लांबीचा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासात मैलाचा दगड ठरेल मात्र आता महामार्गावर वेग मर्यादा पाळावी लागणार आहे

संजय जाधव

बुलढाणा : नागपूर- मुंबई असा ७०१ किलोमीटरचा जागतिक दर्जाचा दृतगती असलेला समृद्धी महामार्ग पूर्णपणे तयार झाला आहे. या मार्गाने आता नागपूर ते मुंबई आठ तासात गाठता येत आहे. मात्र समृद्धी महामार्गावर वेगाच्या नियमांचे उल्लंघन अनेक वाहने करताना आढळून येतात. आता मात्र वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास वाहन धारकास दंड ठोठावण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक वाहनाच्या वेगावर सीसीटीव्हीद्वारे नजर राहणार आहे. 

राज्यात साकारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गामुळेमुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास फक्त ८ तासांमध्ये गाठता येणार आहे. हा महामार्ग तयार करण्यासाठी एमएसआरडीसीने तब्बल ५५ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. आता समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले असून संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला करण्यात आला आहे. त्यानुसार प्रवाशांसाठी सर्व सोयीसुविधा देखील आता पुरविल्या जाणार आहेत.

१ किमी अंतरावर बसणार स्पीड सेंसर गन 

या संपूर्ण सातशे एक किलोमीटरच्या महामार्गावर प्रत्येक किलोमीटरवर एक सीसीटीव्ही कॅमेरा व स्पीड सेंसर गन लावण्यात येणार आहे. त्यामुळे वेगाचे उल्लंघन करणाऱ्यांना तात्काळ दंडाची पावती मोबाईलवर मिळणार आहे. आता समृद्धी महामार्गावर जवळपास एक हजार कॅमेरे बसविण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. याकरिता एमएसआरडीसीने दोन नामांकित कंपन्यांसोबत करार केल्याची ही माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अशी राहणार वेग मर्यादा 

दरम्यान समृद्धी महामार्गावरून जाताना वाहने सुसाट वेगाने धावत असतात. परंतु आता यामुळे समृद्धीवरून जाणाऱ्या वाहनांसाठी वेग मर्यादा घालून देण्यात येणार आहे. त्यानुसार हलक्या वाहनांसाठी वेग मर्यादा १२० किलोमीटर प्रति तास तर ट्रक आणि अवजड वाहनांसाठी ८० किलोमीटर प्रतितास अशी वेग मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र अनेक वाहने वेग मर्यादेसह लेन कटिंगचे उल्लंघन करताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: थंडी पडताच ओठ काळे होतात; 'हे' घरगुती उपाय तुम्हाला देतील सॉफ्ट पिंक लिप

Winter Health Drink : हिवाळ्यात पिया तुळस आणि काळी मिरीचा चहा

Bus Fire: राजस्थानमध्ये पुन्हा अग्नितांडव! धावत्या बसला भीषण आग, ३ जण जिवंत जळाले

Sai Tamhankar Photos: अस्सल मराठमोळं सौंदर्य, कपाळी टिकली अन् केसांत गजरा घालून दिसली सई

Maharashtra Live News Update: बंजारा समाजाचे शिष्टमंडळ 31 तारखेला घेणार मुख्यमंत्री फडणवीस भेट

SCROLL FOR NEXT