Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana : समृद्धी महामार्गावर अवैध गुटख्याची तस्करी; एक कोटी १३ लाखांचा गुटखा जप्त

Buldhana News : समृद्धी महामार्गावरील फर्दापूर टोलनाका येथे कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून, आतापर्यंतची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. एलसीबीने एक कोटी 13 लाखांचा गुटखा जप्त केला

संजय जाधव

बुलढाणा : गुटखा तस्करी करण्यास बंदी असताना देखील सर्रासपणे गुटख्याची तस्करी केली जात आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात गुटखा माफियांविरुद्ध पोलिसांनी आणखी एक मोठी धडक कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने काल रात्री मेहकर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील फर्दापूर टोलनाका येथे कारवाई करत तब्बल १ कोटी १३ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. 

गुटखा तस्करी करण्यास बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. बंदी असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक केली जात आहे. दरम्यान समृद्धी महामार्गावरून एका ट्रक मध्ये गुटख्याची तस्करी केली जात असल्याची माहिती बुलढाणा पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला होता.

अमरावतीहून मुंबईकडे गुटखा तस्करी होत असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. यावरून एलसीबीच्या पथकाने फर्दापूर टोलनाक्यावर सापळा रचला. संशयित दोन ट्रक आले असता पोलिसांच्या पथकाने त्यांची तपासणी केली असता या दोन ट्रक गुटखा आढळून आला. त्यात गुटख्याने भरलेला तब्बल १ कोटी १३ लाख रुपयांचा गुटखा निघाला. गुटख्यासह दोन्ही ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 

तिघांना केली अटक 

दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद इम्रान मोह. हफिज, अचलपूर), अजीम बेग हाफिज बेग (अमरावती) आणि एजाज अहमद अजीज अहमद (अमरावती) या तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या कारवाईत गुटखा व दोन ट्रकसह एकूण १ कोटी ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामुळे गुटखा तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT