Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : अतिवृष्टीच्या नुकसान भरपाइसाठी झाडावर बसून उपोषण

Nandura Buldhana News : अतिवृष्टीच्या नुकसान भरपाइसाठी झाडावर बसून उपोषण

Rajesh Sonwane

संजय जाधव 

बुलढाणा : मागील महिन्यात नांदुरा तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे आलेल्या महापुरात (Buldhana) नदीकाठावरील नागरिकांच्या घराचे तसेच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसात झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी (MNS) मनसेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात येत असून झाडावर बसून आमरण उपोषण केले जात आहे. (Maharashtra News)

अतिवृष्टीमुळे नांदुरा तालुक्यातील माळेगाव गोंड, खडदगाव, लोणवाडी, पिंपळखुटा धांडे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. नांदुरा तालुक्यात झालेल्या (Heavy Rain) पावसातील नुकसानीबाबत प्रशासनाला नुकसान भरपाईसाठी वारंवार निवेदने देऊन अद्यापही सानुग्रह मदतीचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी तसेच ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदुरा तालुका उपाध्यक्ष राजेश काळे यांच्या नेतृत्वात बदामच्या झाडावर बसून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. 

मदत मिळेपर्यंत आंदोलन 

तहसीलदारानी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील १२५ घरांची पडझड असून ७६ जनावरे पुराच्या पाण्यात वाहुन गेली आहेत. तर ११ जनावरांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे झाले असून अद्यापही सानुग्रह मदतीचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे मनसेच्यावतीने हा आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. तर जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही; तोपर्यंत झाडावर बसून उपोषण चालूच राहणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! या बँकेचा परवाना केला रद्द, कारण काय?

High Court: अल्पवयीन मुलींशी लग्न करून शरिरसंबंध ठेवणं बलात्कारच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Jhansi Hospital Fire : झाशींमध्ये हाहा:कार! रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू

IQ Test: मधमाशांच्या मोहोळात लपलीये एक मुंगी; शोधण्यासाठी तुमच्याकडे आहेत केवळ १० सेकंद

Viral Video: फालतू शायनिंग! धावत्या लोकलमधून चिमुकल्याचा जीवघेणा स्टंट; Video पाहून होईल संताप

SCROLL FOR NEXT