Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : पिकांचे नुकसान करणाऱ्या रोही, रानडुक्कर यांना मारण्याची परवानगी; वन विभागाला द्यावे लागणार पत्र

Buldhana News : वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक दिवसापासून आंदोलन सुरू केलं होते.

संजय जाधव

बुलढाणा : शेतात लागवड केलेल्या पिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात असते. प्रामुख्याने यात रोही व रानडुकरांचा अधिक त्रास असतो. यामुळे (Farmer) शेतकरी त्रस्त झालेला आहे. मात्र वन्य प्राण्यांच्या त्रासापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण शेती पिकांचे (Buldhana) नुकसान करणाऱ्या रोही व रानडुकरांना मारण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्यात अशाप्रकारे प्राणी मारण्याच्या परवानगीची बुलढाण्यातून होणार सुरुवात. (Tajya Batmya)

वन्य प्राण्यांच्या (Wild Animals) त्रासाला कंटाळून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक दिवसापासून आंदोलन सुरू केलं होते. वन विभागाकडे अशा प्रकारच्या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ही आंदोलनाद्वारे करण्यात आली होती. बुलढाणा जिल्ह्यात रोही, हरण व रान डुक्कर या प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचं शेतीच मोठं नुकसान होत होतं. यामुळे शेतकरी त्रस्त झाला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र आता आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या या लढ्याला यश मिळाले, असून वन्य प्राण्यांपैकी रोही व रानडुक्कर या प्राण्यांमुळे जर नुकसान होत असेल; तर (Forest Department) वन विभागाकडून रीतसर परवानगी घेऊन या प्राण्यांना ठार मारण्याची परवानगी देण्यात यावी असं पत्र वनविभागाला नुकताच प्राप्त झाला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या नुकसानीला कंटाळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT