Sindkhed Raja : सिंदखेड राजा युवा संघर्ष समितीचे अनाेखे आंदाेलन, स्वतःच्या तोंडाला काळ फासून सरकारचा नाेंदविला निषेध

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. शासनाने आजच्या आंदाेलनाचा विचार करून तात्काळ मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी आंदाेलकांनी केली आहे.
sindkhed raja yuva sangharsh samiti andolan in buldhana
sindkhed raja yuva sangharsh samiti andolan in buldhana saam tv

Buldhana :

शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण करण्यासाठी सिंदखेड राजा येथील युवा संघर्ष समितीचे (sindkhed raja yuva sangharsh samiti) अध्यक्ष कैलास मेहेत्रे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शेतकऱ्यांनी स्वतःच्या तोंडाला काळ फासून आंदाेलन छेडले. आज आम्ही आमच्या ताेंडाला काळ फासले आहे, मागण्या मान्य न झाल्यास अधिका-यांच्या ताेंडाला काळं फासणार असा इशारा आंदाेलकांनी सरकारला दिला आहे. (Maharashtra News)

आंदाेलक म्हणाले शासनाकडून सन 2023 /24 खरीप रब्बी पिक विमा मिळावा, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ मिळावी, गारपिटीने नुकसान झालेल्या शेडनेट व बीज उत्पादकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, कोरडा दुष्काळ व अतीवृष्टी गारपीटीची नुकसान भरपाई शंभर टक्के मिळावी, शेतीसाठी दिवसा वीज मिळावी व रात्री सिंगल फेज वीज मिळावी, शेती पिकांना रोही हरीण रानडूकर या वन्यप्राण्यापासून संरक्षण मिळावे , शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी आदी आमच्या मागण्या आहेत.

sindkhed raja yuva sangharsh samiti andolan in buldhana
Washim Crime News : वाशिममध्ये घटना घडली होती, टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी ५ जणांना धरलं; अकोला, बुलडाणा कनेक्शन उघड

महसूल प्रशासनाला इशारा देऊन वारंवार निवेदन स्मरणपत्र देऊन सुद्धा तालुक्यातील नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे शासनाने या निवेदनाचा विचार करून तात्काळ प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज आम्ही स्वतःच्या तोंडाला काळ फासलाय आमच्या मागण्या जर मंजूर केल्या नाही तर उद्या तुमच्या तोंडाला काळ फासले जाईल असा इशारा कैलाश मेहेत्रे यांनी सरकारला दिला आहे. यावेळी आंदाेलकांनी सिदखेडराजा तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले.

Edited By : Siddharth Latkar

sindkhed raja yuva sangharsh samiti andolan in buldhana
Gondia : शासकीय धान खरेदीला ३१ पर्यंत मुदतवाढ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com