राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिकमध्ये पोहोचली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत आज शरद पवार आणि संजय राऊत यांच्यासह काँग्रेसचे नेते सहभागी झाले आहेत. महाविकास आघाडीकडून येथे सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची भाषणे झाली.
राहुल गांधी यांच्या या भारत जोडो यात्रेत संजय राऊतांची हवा पाहायला मिळाली. संजय राऊत यांचं देखील भाषण येथे पार पडलं. संजय राऊत ज्यावेळी भाषणाला उभे राहिले, त्यावेळी सभेसाठी जमलेल्या लोकांकडून शिट्ट्या आणि घोषणाबाजी सुरू झाले. संजय राऊत यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
संजय राऊत यांनी म्हटलं की, आपण राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी आलो आहोत. आपल्या सगळ्यांचे ते नेते आहेत. मी काश्मीरमध्ये देखील त्यांच्यासोबत चाललो होतो. देश जोडण्यासाठी आणि माणसांची मनं जोडण्यासाठी ते चालत आहेत. इंदिरा गांधी जेव्हा देशात राजकारण करत होत्या तेव्हा 'इंदिरा गांधी आई है, नई रोषणी लाई है, असं आम्ही बोलत होतो. आता राहुल गांधी यांनी देखील रोषणी आणली आहे. (Latest Marathi News)
राहुल गांधी आज शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची मन की बात ऐकत आहेत. केवळ स्वत:च्या मन की बात सांगत नाहीत. मुंबईत राहुल गांधी यांच भव्य स्वागत होईल. नरेंद्र मोदी आणि अमित शाह आले की भाड्याने लोक आणावी लागतात. पण राहुल गांधी यांच्यासाठी लोक स्वत:हून येतात. चांदवड या कांदा नगरीत शेतकऱ्यांना रडवले. गद्दार आमदारांना, खासदारांना ५० कोटी रुपये मिळतात. पण शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. पंतप्रधान मात्र काहीच करत नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
२ कोटी लोकांना रोजगार ही मोदींच्या गॅरंटी आहे. पण कांद्यामुळे किती लोक बेरोजगार झाले. मोदीजी नाशिकमध्ये आले तेव्हा काही जणांना नजरकैदेत ठेवलं होतं. भारत जोडो यात्रेला जसा प्रतिसाद मिळतोय, त्यावरुन परिवर्तन होईल हे नक्की. भारत जोडो यात्रेने एक गॅरंटी नक्की दिली, ती म्हमजे मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. या यात्रेत महाराष्ट्र आणि महाविकास आघाडी राहुल गांधी यांच्या सोबत आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.