Buldhana NCP News Saam tv
महाराष्ट्र

NCP News: ऐन दिवाळीच्या दिवशी खाल्‍ली चटणी भाकरी; राष्‍ट्रवादीचे आनंदाचा शिधासाठी आंदोलन

ऐन दिवाळीच्या दिवशी खाल्‍ली चटणी भाकरी; राष्‍ट्रवादीचे आनंदाचा शिधासाठी आंदोलन

संजय जाधव

बुलढाणा : दिवाळीच्‍या पाश्‍र्वभुमीवर राज्‍य सरकारने गोरगरीबांची दिवाळी गोड व्‍हावी या उद्देशाने आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. परंतु, हा शिधा (Diwali) दिवाळी आली तरी देखील गरज असलेल्‍यांपर्यंत पोहचला नाही. यामुळे आक्रमक झालेल्‍या (NCP) राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने आज चटणी भाकर आंदोलन करत सरकारचा निषेध केला. (Live Marathi News)

जनतेने मागणी न करतानाही सरकारने राज्यातील जनतेला दिवाळीसाठी आनंदाचा शिधा दिवाळीपूर्वी देण्याचे जाहीर केले. मात्र हा शिधा (Buldhana) बुलढाण्यातील जनतेलाच काय; पण ज्यांना याची गरज होती अशा आदिवासी जनतेलाही हा शिधा दिवाळीच्या दिवशी सुद्धा मिळाला नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होत आदिवासी बहुल (Jalgaon) जळगाव जामोद उपविभागीय कार्यलयासमोर सरकार विरोधी घोषणाबाजी करत ऐन दिवाळीच्या दिवशी चटणी भाकरी खाऊन सरकारचा निषेध करत आंदोलन केले.

गरजवंतांपर्यंत पोहचलेच नाही पाकिट

आदिवासी जनतेला खरं तर आनंदाचा शिधा मिळणे जरुरी होते. आज दिवाळी आली असताना देखील जिल्ह्यातील आदिवासी बहुल जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात अध्याप या शिध्याच एकही पेकेज पोहोचलेले नाही. याचा निषेध राष्‍ट्रवादीतर्फे केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सेक्सटॉर्शन, डिजिटल अरेस्ट.. मुंबईकरांनी १५ महिन्यात गमावले ११२७ कोटी रूपये

Tax Saving Tips : करदात्यांच्या कामाची बातमी! टॅक्स वाचवण्याचे ५ मार्ग, ITR फाइल करण्याआधी नोट करा

HBD Sonu Nigam : लग्जरी गाड्यांचा शौकीन सोनू निगम कोट्यावधींचा मालक

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय ठोंबरे पोलिस आयुक्तलयात जाणार

Sanjay Raut : 'ED धाडीचे धागेदोरे भुसेंपर्यंत जाऊ शकतात' संजय राऊत यांचा भुसेंवर हल्लाबोल | VIDEO

SCROLL FOR NEXT