Gulabrao Patil Missing Thackeray Group complaint Buldhana Police Station Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News: पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता! ठाकरे गटाकडून पोलिसांत तक्रार; शोधून देणाऱ्यास बक्षीस जाहीर

Buldhana Latest News: ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी बुलडाणा पोलीस ठाणे गाठून चक्क जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव, साम टिव्ही

Buldhana Latest News: ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी बुलडाणा पोलीस ठाणे गाठून चक्क जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पालकमंत्र्यांना शोधून देणाऱ्यास ठाकरे गटाकडून ११०० रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.

मागील काही दिवसांपासून जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पावसामुळे हजारो गुरढोरं वाहून गेले, शेती खरडून गेल्यात तसेच अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.

अशा बिकट परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)  यांनी जिल्ह्याकडे एकदाही ढुंकून पाहिले नाही, असा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांची साधी विचारपूस देखील केलं नसल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे.

पुरामुळे संसार उध्वस्त झाल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून अनेक नागरिक उपाशी पोटी दिवस काढत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना प्रशासनाकडून कुठलीही मदत केली जात नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

बुधवारी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट जळगाव जामोद (Buldhana News) पोलीस ठाणे गाठले. अचानक पदाधिकारी पोलीस ठाण्यात आल्यानंतर काही काळ पोलिसही गोंधळून गेले होते. हे पदाधिकारी कोणत्या कामासाठी आले असावे, असा प्रश्न पोलिसांना पडला. मात्र त्यांनी चक्क पालकमंत्री बेपत्ता असल्याची तक्रार दिल्याने व त्यांना शोधून आणण्याची अजब मागणी केल्याने पोलिसही थक्क झाले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Hindi Sakti : हिंदी सक्तीविरोधात शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल | VIDEO

Weight loss tips : आता वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज नाही, फक्त या ३ गोष्टी लक्षात ठेवा

Pune Rave Party: खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, त्याच सूटमध्ये २४ तास आधीही रंगली होती पार्टी

नवऱ्याला रेव्ह पार्टीत बेड्या, २४ तासानंतर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया, दोन ओळीत विषय संपवला

SCROLL FOR NEXT