Buldhana Jamod Lok Sabha Voting News  Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News: ढग गडगडले, वारा सुटला अन् मतदान केंद्रावरील पत्रे उडाली; लोकांची पळापळ, निवडणूक अधिकारी जखमी

Buldhana Breaking News: जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील मतदान केंद्रावरील पत्रे उडाली अन् नागरिकांची धावपळ सुरू झाली. यावेळी छताचे लाकूड कोसळल्याने निवडणूक कर्मचारी जखमी झाले.

Satish Daud

संजय गडदे, साम टीव्ही बुलढाणा

Buldhana Jamod Lok Sabha Voting News

जळगाव जिल्ह्यातील जामोद तालुक्यात शुक्रवारी (ता. २६) सुरळीत मतदान सुरू होते. मात्र, अचानक ढग गडगडले. काही वेळातच सोसाट्याचा वारा सुटला. क्षणार्धात मतदान केंद्रावरील पत्रे उडाली अन् नागरिकांची धावपळ सुरू झाली. यावेळी छताचे लाकूड कोसळल्याने निवडणूक कर्मचारी जखमी झाले.

डॉक्टर गजानन वानखेडे असं जखमी कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी (26 एप्रिल) मतदान पार पडलं. मतदानावेळी काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याने नागरिकांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागलं.

तर काही भागात मतदानावेळी वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस सुरू झाल्याने मतदारांसह निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील मतदान केंद्रावर मतदान सुरू असताना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

वाऱ्याचा वेग जास्त असल्याने जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ४५ आणि ४६ वरील टीनपत्रे अचानक उडून गेली. शाळेवरील तीन पत्रे हवेत उडून गेली. तर काही पत्रे मैदानावर जाऊन पडली. यावेळी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांसह निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.

जीव वाचवण्यासाठी मतदार सैरावैरा पळत सुटले. दुसरीकडे ईव्हीएम मशीन बाहेर काढत असताना छताचे लाकूड कोसळल्याने निवडणूक अधिकारी डॉक्टर गजानन वानखेडे जखमी झाले. त्यांना प्राथामिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर वानखेडे यांना सुट्टी देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes: वारंवार लघवीला जाताय, तहान-भूक वाढलीये? डायबेटीजच्या सुरुवातीच्या ४ लक्षणाकडे दुर्लक्षित करु नका, अन्यथा...

Maharashtra News Live Update: बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळल्याने राष्ट्रवादी लागली कामाला

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार?

Oily Skin Face Wash Tips: उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी कोणता फेसवॉश बेस्ट? जाणून घ्या

Petrol Diesel Price: मोठी बातमी! युद्धबंदीच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाचे दर घसरले, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT