Heat Wave Alert: महाराष्ट्रात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा; मुंबई, ठाण्यासह कोकण तापणार, IMD कडून अलर्ट

Maharashtra Weather Alert: मुंबई, ठाण्यासह कोकणात आजपासून पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Heat Wave Alert
Heat Wave Alertsaam tv

Weather Update 27 April 2024

भारतीय हवामान खात्याने राज्याला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणात आजपासून पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

Heat Wave Alert
Onion Export News: गुजरातला 2 हजार टन पांढरा कांदा निर्यातीची परवानगी, महाराष्ट्राला का नाही? केंद्राला शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील हवामानात मोठमोठे बदल होत आहेत. काही भागात अवकाळी पावसाच्या सरी, तर काही ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २८ आणि २९ एप्रिल रोजी तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, कोकणासह राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येऊ शकते. नागरिकांनी जास्त पाण प्यावे, सुती कपडे घालावेत, असा सल्ला IMD कडून देण्यात आला आहे.

दिल्लीतही उष्णतेच्या लाटेचा इशारा

IMD ने दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडसह देशातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात आजपासून पुढील ३ दिवस उष्णतेची लाट येऊ शकते, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, रायलसीमा, अंतर्गत कर्नाटक आणि पूर्व उत्तर प्रदेशाला अलर्ट जारी करण्यात आलाय.

मराठवाडा-विदर्भात पावसाची शक्यता

दुसरीकडे आयएमडीने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह तुफान पावसाचा इशारा दिला आहे. पुढील ४८ तासांत या भागात जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. तर काही ठिकाणी गारपीट होणार, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

Heat Wave Alert
Nanded News : नांदेडमध्ये कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडलं; तरुण पोलिसांच्या ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com