Buldhana News
Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: चार दिवसांच्या अवकाळी पावसाने गावाचा संपर्क तुटला; रेल्वे रुळावरून करावा लागतोय जीवघेणा प्रवास

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील शेगावपासून (Shegaon) अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एकफळ गावातील नागरिकांना अवकाळी पावसाने जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. गेल्या (Buldhana News) चार दिवसांपासून सातत्याने या परिसरात कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे भर उन्हाळ्यात या गावातील नागरिकांना चिखल तुडवत व रेल्वे रुळावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. (Tajya Batmya)

शेगाव लगत असलेल्‍या एकफळ गावाला रस्ताच नसल्यामुळे व गेल्या चार दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे या गावात दुचाकीही जाण्यास मार्ग नाही. त्यामुळे गावातील आजारी रुग्णांना शाळकरी मुलांना व वयोवृद्ध नागरिकांना जीवघेणा संघर्ष करत रेल्वे गुळावरून पाच किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे. भर उन्हाळ्यात या नागरिकांना अवकाळी पावसामुळे या यातना सहन कराव्‍या लागत आहेत. तर पावसाळ्यात या नागरिकांच्या हाल न विचारलेलेच बरे..!

रस्‍ता नसल्‍याने लग्‍नही होईना

गावाला रस्ताच नसल्यामुळे या गावातील ३० ते ३५ तरुणांचे लग्न जुळत नसल्याचाही गावकरी सांगत आहेत. गावाला रस्ता नसल्यामुळे या गावात या तरुणांना कुणी मुलगीही देत नाही हे भीषण वास्तव स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर अवकाळी पावसाने निमित्ताने समोर आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रा करण्यापुर्वी 'हे' काम नक्की करा

Glowing Skin साठी खा हे पदार्थ; चेहऱ्याचं सौंदर्य उजळेल

Amit Shah: कलम ३७० ते रामलला दर्शन; अमित शहांनी राहुल गांधींना विचारले मोठे ५ प्रश्न

CBSE Board 10th Result 2024: CBSE १० वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली; परीक्षेचा निकाल जाहीर

Maharashtrian Dish: झणझणीत! तोंडाला पाणी सुटेल असा मिरचीचा ठेचा

SCROLL FOR NEXT