Buldhana Accident Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Accident : ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

संजय जाधव

बुलढाणा : महावितरणच्या विद्यूत लाईनचे कामासाठी लागणारे इलेक्ट्रिक पोल ट्रॅक्टरमधून नेले जात होते. हे ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात झाला. यात ट्रॅक्टरवर बसलेल्या तीन मजुरांचा पोलखाली दबले गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. 

बुलढाणा (buldhana) जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील पूनई गावाजवळ हा भीषण अपघात दुपारच्या सुमारास घडला आहे. हे मजूर इलेक्ट्रिक पोल उभे करण्यासाठी जात असतानाच हा अपघात (Accident) घडला असून, सर्व मृतक हे खामगाव जवळील वाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ट्रॅक्टर पलटी झाल्यानंतर सर्व सिमेंटचे पोल मजुरांच्या अंगावर पडले. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. 

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर साधारण आठ ते दहा पोल ठेवण्यात आले होते. रस्त्याने जात असताना अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. मात्र अपघात कसा घडला याबाबत मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. तसेच अपघातात मृत झालेल्या तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : 15 दिवसांत आचारसंहिता लागेल, कार्यकर्त्यांनो कामाला लागा; अजित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, VIDEO

Maharashtra News Live Updates : आरटीओ कर्मचारी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार

Satara : इंद्रधनुष्याची चादर अन् डोंगर रांगा, साताऱ्यातील गाव पाहून होईल स्वर्गाची अनुभूती

Tirupati Laddu Controversy: 'नायडू हे खोटे बोलणारे, राजकारणासाठी श्रद्धेशी खेळतायत', लाडूच्या वादावर जगन यांचं पंतप्रधानांना पत्र

Beetroot Juice: सकाळी बिटरुट ज्यूस पिण्याचे जबरद्स्त फायदे...

SCROLL FOR NEXT