Isoli Grampanchayat Scam Saam tv
महाराष्ट्र

Isoli Grampanchayat Scam : ग्रामस्थांना कर पावत्या दिल्या बोगस; इसोली ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पंचायत समिती अंतर्गत असलेल्या इसोली ग्रामपंचायतमध्ये अजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी कर भरल्यानंतर चक्क बोगस पावत्या करदात्यांना देण्यात आल्या

संजय जाधव

बुलढाणा :  ग्रामपंचायतींमध्ये सुरु असलेला कारभार रामभरोसे चालविला जात असल्याचे अनेक ठिकाणी पाहण्यास मिळते. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या इसोली ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांनी कराची रक्कम भरल्यानंतर त्यांना बोगस पावत्या देण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

ग्रामपंचायतमध्ये चालणार कारभार सरपंच व ग्रामसेवक यांच्या भरोशावर चालत असतो. मात्र अनेक ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्ट्राचार होत असल्याचे पाहण्यास मिळते. तर काही ग्रामपंचायती कर वसुलकडे दुर्लक्ष करत असतात. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पंचायत समिती अंतर्गत असलेल्या इसोली ग्रामपंचायतमध्ये अजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी कर भरल्यानंतर चक्क बोगस पावत्या करदात्यांना देण्यात आल्या आहेत. 

पावत्यांवर शिक्काच नाही 

२०१२ ते २०२५ या कालावधीत ग्रामपंचायतमध्ये २५ ते ३० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून ग्रामस्थांकडून कर वसुली करताना ग्रामसेवक, सरपंच, शिपाई यांनी संगनमत मत करून कर पावत्या ह्या बोगस दिल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे. ज्या कर पावत्या ग्रामस्थांना दिल्या त्यावर ग्रामपंचायतचां कुठलाही शिक्का नसून त्या पावत्यांचे पैसे ग्रामसेवकाने खात्यात जमा केलेच नाही. 

इतर कामातही भ्रष्ट्राचार 

या शिवाय ग्रामपंचात अंतर्गत झालेल्या इतर कामात देखील भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज ग्रामस्थानी केला आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून कारवाई करावी; अशी मागणी करण्यात येत आहे. तर चिखली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना याबद्दल विचारणा केली असता संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करू; आहे आश्वासन दिले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगाचे नवे नोटिफिकेशन जारी, मुंबईत महत्त्वाची बैठक

Mumbai Flyover: मुंबईकरांचा प्रवास सुसाट! नवीन उड्डाणपूल लवकरच होणार सुरू, कुणाला होणार फायदा?

Maharashtra News Live Update: गिरीश महाजनांची कार्यतत्परता; अपघातग्रस्त ट्रक चालकाला स्वतः मदत करत बाहेर काढले

Pitru Paksha 2026: यावर्षी पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Traffic Update : पुण्यात गणपती विसर्जनादिवशी वाहतुकीत मोठा बदल! महत्त्वाचे रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT