Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना घराला लागली आग; आरडाओरड केली, पण...

दुर्दैवी घटना..पहाटे घराला आग, मतिमंद व्यक्तीचा होरपळून मृत्यू

संजय जाधव

बुलढाणा : डोंगर खंडाळा येथील रात्री तीन वाजेच्या सुमारास घराला अचानक आग लागली. घर पेटल्याने घरात झोपलेल्‍या व्यक्तीचा होरपळून मृत्यू (Death) झाल्‍याची दुर्देवी घटना घडली आहे. या प्रकाराबाबत पोलिस (Police) तपास करत आहेत. (Live Marathi News)

घराला पहाटे तीनच्‍या सुमारास अचानक आग (Fire) लागल्‍याने किसन या इसमाचा मृत्‍यू झाला आहे. घराला आग लागल्‍याचे शेजाऱ्यांनी पाहिले असता त्‍यांनी आरडाओरड केली. यामुळे परिसरातील सर्वजण उठले व आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच ही माहिती पोलिसांना कळविली.

पोलिसांनी तात्काळ अग्निशामक व पोलीस विभाग घटनास्थळी पोहोचले. यानंतर अग्‍नीशामक बंबाच्‍या सहाय्याने आग विझविली. तसेच होरपळून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. हा व्यक्ती घरात एकटाच राहत होता. या प्रकरणी नेमका काय प्रकार झाला व आग कशी लागली की आग लावली यासंदर्भात पोलीस चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Manjar: ऑपरेशन टायगरनंतर महाराष्ट्रात सुरू होणार 'ऑपरेशन मांजर', एकनाथ शिंदेवर मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेत काँग्रेसचे आंदोलन, पाणी कपात अयोग्य असल्याचा आरोप

Shocking: व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत महिला पोलिसाची आत्महत्या, धावत्या ट्रेनसमोर मारली उडी

Dahisar Tourism : दहिसरजवळील ५ 'सीक्रेट' पिकनिक स्पॉट्स, वीकेंड होईल एकदम खास

ठाकरे गटानंतर आणखी एक मोठं 'ऑपरेशन'; २५ ते २६ खासदार फुटणार, देशाच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT