Dhangar Reservation Saam tv
महाराष्ट्र

Dhangar Reservation : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण हवे; जिल्हाधिकारी कार्यलयावर काढला मोर्चा

Buldhana News : धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाजाच्यावतीने लढा उभारण्यात आला आहे. अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चा झाल्यानंतर शासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही

संजय जाधव

बुलढाणा : धनगर समाजाचा आरक्षणासाठी लढा सुरु आहे. याकरिता गेल्या १५ दिवसापासून धनगर समाजाचा युवक नंदू लवंगे हा जिल्हाधिकारी कार्यलयासमोर बेमुदत उपोषणास बसला आहे. परंतु कोणताही निर्णय न झाल्याने (Buldhana) आज समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. (Breaking Marathi News)

धनगर समाजाला आरक्षण (Dhangar Reservation) मिळावे या मागणीसाठी समाजाच्यावतीने लढा उभारण्यात आला आहे. अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चा झाल्यानंतर शासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. दरम्यान आरक्षणासाठी धनगर समाजाचा युवक नंदू लवंगे हा बेमुदत उपोषणाला बसला आहे. अद्यापपर्यंत सरकारने दखल न घेतल्याने बुलढाणा जिल्ह्यातील धनगर समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे ४ दिवसासून जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध आंदोलने करीत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकार विरोधात घोषणाबाजी 

आरक्षणासाठी आता धनगर समाज रस्त्यावर उतरला असून आज जिल्हाधिकारी कार्याल्यावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात हजारो महिला- पुरुष सामील झाले होते. या मोर्च्यात सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उग्र आंदोलन करण्यात येतील असा ईशारा यावेळी देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आज प्रचाराचा शेवटचा दिवस, मुख्यमंत्री दुचाकी चालवत करणार रोड शो

Haldi Kumkum gift ideas: यंदा संक्रांतीच्या हळदी-कुंकवासाठी काय वाण देणार? या आयडिया ठरतील बेस्ट ऑप्शन

Ladki Bahin Yojana: कोणत्याही क्षणी लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹३००० येणार? वाचा नवीन अपडेट

Cash For Votes : महापालिका निवडणुकीत मतांची किंमत 3 हजार, नेमकं कुठं कुठं पैसे वाटणाऱ्यांचा भंडाफोड

Success Story: आधी इंजिनियरिंग; १२ लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडली अन् UPSC दिली; IPS सईम रजा यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT