संजय जाधव, साम टीव्ही | बुलढाणा २८ जानेवारी २०२४
आगामी लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसं राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या कानाखाली आवाज काढावा लागेल, असं रायमुलकर यांनी जाहीर सभेतून म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यांच्या या विधानामुळे रविकांत तुपकर यांचे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे. आमदार रायमुलकर यांनी शनिवारी (२७ जानेवारी) बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातल्या उकळी-सुकळी या गावात जाहीर सभा घेतली.
या सभेतून त्यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या जोरदार हल्लाबोल केला. तुपकरांच्या सभेत घुसुन त्यांच्या कानाखाली मारू, असं वादग्रस्त वक्तव्य आमदार रायमुलकर यांनी भरसभेतून केलं.
इतकंच नाही, तर त्यांनी रविकांत तुपकर यांच्या वकील असलेल्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्यावरही टीका केली. याशिवाय सभेला हजर असलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनीही तुपकरांवर टीकास्त्र डागले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लोकसभेचे वारे वाहू लागल्यामुळे बुलढाण्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जंगी सभा घेण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांचे दौरे आणि सभाही जिल्हाभरात पाहायला मिळत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे देखील आगामी लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातंय. शेतकऱ्यांनी आग्रह धरल्यामुळे ते लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. दरम्यान, रायमुलकर यांच्या टीकेला तुपकर काय उत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.