Buldhana News Saam TV
महाराष्ट्र

Buldhana : चिमुकल्याला खेळता-खेळता श्वास घेता येईना; डॉक्टरांकडे नेले, एक्सरे बघून पालक हादरले...

तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्याकडे नीट लक्ष द्या. चुकूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.

साम टिव्ही ब्युरो

बुलडाणा : तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्याकडे नीट लक्ष द्या. चुकूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण, बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यात एक अशी घटना घडली, जी वाचून तुमच्याही अंगावर काटा येईल. जिल्ह्यातील शेगाव येथे एका चिमुकल्याला अचानक खेळता-खेळता श्वसनाचा त्रास सुरू झाला. ही गोष्ट पालकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं. (Buldhana News Today)

डॉक्टरांनी या चिमुकल्याचा एक्सरे काढला. एक्सरे पाहून डॉक्टरांसह चिमुकल्याच्या पालकांच्याही पायाखालची जमीन सरकली. आशिर मोहम्मद आमिर असं साडेतीन वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. आशिरने नकळकत खेळता-खेळता १ रुपयांचं नाणं गिळलं होतं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे त्याला वाचवण्यात यश मिळालं.

नेमकं काय घडलं?

शेगाव शहरात राहणाऱ्या मोहम्मद आमिर यांच्या साडेतीन वर्षीय चिमुकल्याला खेळताना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर आमिर यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तेथे डॉक्टरांनी एक्सरे काढला असता, आशिरने १ रुपयांचं नाणं गिळलं असल्याचं लक्षात आलं.

डॉक्टरांनी फोलिज कॅथेटरच्या मदतीने हे नाणं बाहेर काढून आशिरला जीवदान दिलं. आता आशिर हा सुखरूप असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. नाणे काढल्यानंतर बाळाला जीवदान मिळाल्याने त्याच्या आई-वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पालकांसाठी विशेष सल्ला

लहान मुलांना कळत नसल्याने अनेकदा असे प्रकार घडतात. काही प्रकरणांत मुलांनी गिळलेल्या वस्तू आपोआप बाहेर येतील याची पालक वाट बघतात. त्यामुळे जीवावरही बेतू शकतं. त्यामुळे मुलं 6 वर्षाची होईपर्यंत पालकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. याशिवाय, असं काही घडल्यास वेळ न घालवता रुग्णालयात वेळीच पोहोचणं महत्त्वाचं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांकडूनच मतदार यादीत घोळ; अंबादास दानवेंचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Blast: भयंकर स्फोटाने उत्तर प्रदेश हादरले, दोघांचा मृत्यू; भीषण आग अन् धुराचे लोट

'तेरी गाड़ी को हम ब्लास्ट करेंगे! सनातन संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना बॉम्बने उडवण्याची धमकी

शरद पवारांना पत्र लिहिणारा अकोल्यातील तरूण समोर.. तो म्हणतो, साहेबच माझं लग्न करून देतील|VIDEO

Bigg Boss 19: मृदुल तिवारीला बाहेर काढण्यासाठी रचला कट; बिग बॉस १९ मध्ये प्रेक्षक म्हणून प्रवेश आलेल्या व्यक्तीचा दावा

SCROLL FOR NEXT